वरोरा जिल्हा झालाच पाहिजेच… डॉ. अंकुश आगलावे Warora district must be… Dr. Ankush should be restrained

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15 ऑगस्ट) :- वरोरा जिल्हा झालाच पाहीजेचे मागणी डॉ. अंकुश आगलावे, गुरूदेव प्रचारक वरोरा यांनी वरोरा जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात केली.

      मागील अनेक वर्षापासून वरोरा जिल्हयाची मागणी विविध सामाजिक, राजकीय संघठनाकडून केली जात आहे. वरोरा जिल्हा झाला तर वरोरा शहराचे व त्यातील अनेक गावांचा विकास होईल. यावेळी वरोरा जिल्हा झालाच पाहिजेच्या जयघोषाने वरोरा शहर दुमदुमले.

            वरोरा शहर हे महाराष्ट्र राज्याचे चंद्रपूर जिल्हयातील एक महत्वाचे औद्योगिक शहर असून येथे नगरपालिका असून ब्रिटीश काळात हे शहर मध्य प्रांत चा एक भाग होता हे शहर कोळसा खाणीचे केंद्र होते. वरोराचे शहराचे मुख्य आकर्षन प्रसिध्द आनंदवन आहे. समाजसेवक बाबा आमटे यांची कर्मभुमी येथे असून कुष्ठरोगग्रस्तांचे पुनर्वसन आणि सशक्तीकरणाचे कार्य या केंद्रात केले जाते. 

यावेळी भाजपाचे भगवान गायकवाड, बाबा भागाडे, एहतेशामअली, सुरेश महाजन, तसेच वरोरा जिल्हा संघर्ष समितीचे महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.