श्री विनोद चिकटे सर यांच आजी-माजी विद्यार्थी सम्मेलन संपन्न 

विद्यार्थ्यांना झाले अश्रु अनावर 

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बु (दि.25 डिसेंबर) :-येथील लक्ष्मी लाॅन येथे आज दि. 25 डिसेंबर 2022 ला आजी-माजी विद्यार्थी संमेलन पार पडले. सम्मेलनाला 1990 पासून तर आज पर्यंत शिक्षण घेतले विद्यार्थी उपस्थित होते. यात कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शेतकरी, व्यवसायिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेल्या व सफल झालेल्या विद्यार्थ्यांनी आपणास सरांनी ज्या प्रकारे एखाद्या शिल्पकार शिल्पाला घाव देऊ देऊ मुर्त घडवते त्या प्रकारे सरांनी आम्हाला घडवले असे मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांना तर चक्क अश्रु अनावर झाले. सरांचे काही विद्यार्थी हे पुणे, मुंबई येथे मोठ मोठ्या पदावर आहेत. तर काही परदेशी नोकरी करून परत आले आहे.

त्या सगळ्यांना परत एकत्र बगुन सरांना व विद्यार्थ्यांना गहिवरून आले होते. व एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसुन येत होता. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विशेष परिश्रम आयोजन समिती शेगाव ने घेतले. सूत्रसंचालन भालचंद्र लोड व अर्चना लोडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. चिकटे मॅडम यांनी केले. त्या नंतर स्नेह भोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली.