शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे वरोरा भद्रावती विधानसभेत हळदी कुंकू व स्नेहसंमेलन सोहळा 

✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.17 जानेवारी) :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व मकर संक्रांति सणाचे अवचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )जिल्हा महिला आघाडी तर्फे दिनांक 16.1.2023 ते 27.1.2023 पर्यंत हळदी कुंकू व स्नेहसंमेलन सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्याचा पहिला दिवस काल माढळी व सायंकाळी महाडोळी येथे झाला.

आज दुसरा दिवस नागरी येथे हळदी कुंकू व स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ नर्मदा दत्ताभाऊ बोरीकर जिल्हा महिला संघटिका शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा भद्रावती विधानसभाचे प्रमुख रवींद्र श्रीनिवास शिंदे तसेच वरोरा तालुकाप्रमुख दत्ताभाऊ बोरेकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),विनोद भाऊ वाघमोडे ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी मायाताई नारळे.

उपजिल्हाप्रमुख शिवसेना, कान्होपात्रा बाई सालेकर महिला उपतालुकाप्रमुख, सौ सरला ताई मालोकर शिवसेना वरोरा तालुका समन्वय, नागरी पंचायत समिती विभाग प्रमुख सौ.प्रतिभाताई मांडवकर सरपंच ग्रामपंचायत माडोळी व सौ गंगा ताई वाटोळे नागरी महिला शाखाप्रमुख व नागरी क्षेत्रातील संपूर्ण महिला सदर कार्यक्रमात उपस्थित होत्या.