वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल जाहीर Warora agricultural produce market committee result announced 

🔹सत्ता कुणाच्या हाती . हे अपक्ष उमेदवार ठरविणार काय ?

🔸सत्तेसाठी होणार तारेवरची कसरत 

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.30 एप्रिल) :- 

         २९ एप्रिल काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानानंतर आज दिनांक 29 एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा निकाल मतमोजणीनंतर घोषित करण्यात आला. यामध्ये कोणत्याही पॅनलला स्पष्ट बहुमत नसल्याने अपक्ष विजयी उमेदवार ज्या पॅनल कडे जाईल त्या पॅनलची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीवर येणार असल्याने या निकालात अपक्ष विजयी उमेदवाराचे वजन वाढले आहे. अपक्ष उमेदवाराच्या मतदानावरच कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता बसणार असल्याने या अपक्ष उमेदवाराकडे दोन्ही पॅनलचे लक्ष लागून आहे .

आज घोषित करण्यात आलेल्या निकालामध्ये शेतकरी सहकार पॅनलचे सहकारी संस्था मतदारसंघातून डॉ.विजय देवतळे, जयंत टेमुर्डे, दत्ता बोरेकर , विठ्ठल भोयर, अभिजीत पावडे, राजेश देवतळे, विलास झिले, सहकारी संस्था मतदार संघ महिला गटातून कल्पना टोंगे, संगीता उरकांडे तर शेतकरी विकास पॅनलचे दिनेश कष्टी , ग्रामपंचायत मतदार संघातून राजेंद्र चिकटे, गणेश चवले, हरीश जाधव, पुरुषोत्तम पावडे, अडते व व्यापारी संघ गटातून निरज गोठी, प्रवीण मालू व हमाल व मापारी मतदारसंघातून सोनबा झाडे हे विजयी झाले.

सहकार संस्था मतदार संघ गटातून अपक्ष उमेदवार नितीन मते हे विजयी झाले असून शेतकरी सहकार पॅनल कडे विजयी नऊ उमेदवार तर शेतकरी विकास पॅनल कडे आठ विजयी उमेदवार असल्याने आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाची सत्ता बसणार हे अपेक्षा उमेदवाराच्या मतदानावर अवलंबून असल्याने वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडीकडे तालुका तथा जिल्हा वाशियाचे लक्ष लागले आहे.