देहव्यापार प्रकरणी १३आरोपींना न्यायालयीन कोठडी Court custody of 13 accused in prostitution case

▫️चित्रफीत व्हायरल प्रकरणात चौघांवर गुन्हे दाखल(Four accused in Chitrafeet viral case)

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.10 ऑगस्ट) :- बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना वरोरा पोलिसांना अल्पवयीन मुलगी आढळली आणि शहरातील मोठे देहव्यापाराचे नेटवर्क उघडे पडले.

अल्पवयीन मुलीला देहव्यापारात महिला व पुरुष एजंटने ढकलत तिला विविध ग्राहकाकडे पाठविण्यात आले होते. काही आरोपींनी तीच्यावर चाकुचा धाक दाखवत गँग रेप ही झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या मध्ये १३आरोपींना अटक करुन त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

सदर गुन्हा हा अल्पवयीन मुलीच्या देहव्यापाराचा गंभीर स्वरूपाचा असल्याने या गुन्ह्याची सूत्रे उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांनी आपल्या हाती घेतली आणि तपासाची चक्रे फिरवत सबळ पुराव्याच्या आधारे १३आरोपींना अटक केली.

याच तपासादरम्यान एका तथाकथित नेत्याने त्या अल्पवयीन मुलीसोबत आक्षेपार्ह संभाषण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, यामुळे जनमानसात संताप व्यक्त होत होता, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई केली जावी, अशी जनसामान्यात संतापाची चर्चा होतअसताना कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आयुष नोपानी यांनी आक्षेपार्ह संभाषण करणाऱ्या आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या चार आरोपीची शहानीशा करुन गून्हा दाखल केला.

यामध्ये तथाकथित नेता रमेश कवडूजी मेश्राम, महेश मारुती जिवतोडे, राकेश वामन शिंदे व एका अज्ञाताविरोधात चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. या तपासात आयुष नोपानी यांच्या नेतृत्वाखाली वरोरा पोलीसांनी दमदार कारवाई केल्याने जनमाणसांकडून वरोरा पोलिसांवर शाब्बासकीची थाप पडत आहे, व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा गुन्हा हा भद्रावती पोलिस स्टेशन येथे दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.