“राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल ” महिला-भागिनींच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत “Rani Lakshmibai Mahila Rakshadal” working round the clock for the service of women-partners

173

▫️शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांची माहिती(Information of Shiv Sena (Ubatha) Warora-Bhadravati Assembly Constituency Chief Ravindra Shinde)

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि 9 ऑगस्ट) :- भारतीय संस्कृतीत महिला-भगिनींना नेहमी मान सन्मानाचे स्थान आहे.  ज्या समाजात महिला-भगिनींचा सन्मान होतो. त्या समाजाची चौफेर प्रगती होते. म्हणून कुणीही महिला-भगिनींचा अपमान करू नये. त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होता कामा नये असा अनमोल संदेश संत आणि विचारवंतानी दिला आहे.

परंतु अलिकडे समाजात महिला-भगिनींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या संख्येत सतत भर पडतांना दिसत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना (उबाठा) च्या वतीने झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श समोर ठेऊन महिला-भागिनींच्या सेवेसाठी राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल स्थापन करण्यात आले आहे. सदर दल महिला-भागिनींच्या सेवेसाठी पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने चोवीस तास कार्यरत राहणार असल्याचे शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

         शिवसेना (उबाठा) पूर्व विदर्भ संघटिका तथा पक्ष प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे, पुर्व विदर्भ युवासेना सचिव प्रा. निलेश बेलखेडे, जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, वरोरा तालुका संघटिका सरला मालेकर, शहर संघटिका प्रा. प्रिती पोहाणे, भद्रावती तालुका संघटिका प्रा. अश्लेषा जिवतोडे भोयर, भद्रावती शहर संघटिका माया टेकाम यांच्या नेतृत्वात या दलाची स्थापना करण्यात आली आहे.

       रविंद्र शिंदे यांनी राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल या विषयी अधिक माहिती देतांना सांगितले की, अलिकडेच वरोरा येथे काही समाज विरोधकांकडून एका अल्पवयीन मुलींचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल करण्यात आला.

तसेच वरोरा येथील पोलीस स्टेशन परिसरात दोन माहिलांनी अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशा अप्रिय घटना समाजाला अत्यंत घातक आहे. महिला-भागिनीवर होणाऱ्या अन्यायांचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी संपूर्ण समाजाने संघटीत प्रयत्न करण्याची गरज आहे.

     पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना सदैव महिला-भगिनिंच्या सन्मानासाठी कार्य करीत आहे. याद्दष्टीने महिला-भगिनिंच्या सन्मानासाठी राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल गठीत करण्यात आले आहे. सदर दल महिला-भागिनींच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर असेल.

राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदलाच्या  महिला कार्यकर्त्या, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने अन्याग्रस्त महिला-भगिनिंच्या मदतीला तात्काळ धावून जाईल. या दलात कायदा, वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ भगिनींचा सुध्दा सहभाग राहणार आहे.

     राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल प्रमुख म्हणून शिवसेना जिल्हा महिला संघटिका नर्मदा बोरेकर काम पाहतील. या दलात जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, वरोरा तालुका संघटिका सरला मालेकर, शहर संघटिका प्रा. प्रिती पोहाणे, भद्रावती तालुका संघटिका प्रा. अश्लेषा जिवतोडे, भद्रावती शहर संघटिका माया टेकाम, महिला उपजिल्हाप्रमुख माया नारळे, कमल ढवस, रत्ना वरभे, मनीषा पूसनाके.

शुभांगी डाखरे, कान्होपात्रा सालेवार, प्रीती लांजेकर, भावना खोब्रागडे, दुर्गा खनके, राजश्री वैद्य, काजल पाटील, शिव गुडमल, स्वाती ठेंगणे, कनिष्क आस्वले, प्रणाली मडकाम, नेहा बन्सोड, साक्षी वैद्य, पूजा कुळमेथे, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, शहरप्रमुख खेमराज कुरेकर व शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांचा सक्रिय सहभाग राहील. 

वरोरा येथील महिलांनी मुळीच घाबरण्याची गरज नाही : रविंद्र शिंदे

समाजातील प्रत्येक घटकातील महिला -भगिनींचा नेहमी सन्मान करा. अशी शिकवण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि आमच्या आई-वडीलांनी दिली आहे. आम्ही कोणताही जाती-धर्मभेद पाळीत नाही. त्यामुळे कुठल्याही समाज घटकांतील आमच्या महिला-भागिनिंवर अन्याय-अत्याचार झाल्यास तो मुळीच खपवून घेतल्या जाणार नाही.

कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने अन्यायाचा प्रतिकार करू म्हणून वरोरा येथील नुकत्याच अन्याय झालेल्या अल्पवयीन मुलीसह महिलांनी घाबरण्याची गरज नाही. अन्यायग्रस्त महिला-भगिनींनी राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल कार्यकर्त्या युवतीशी तसेच वरोरा येथील पक्षाच्या “शिवालय” मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.