भवानजीभाई चव्हाण विद्यालयात लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाचे गठन Formation of School Cabinet in Bhawanjibhai Chavan Vidyalaya in a democratic manner

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.8 ऑगस्ट) :- भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे लोकशाही मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने लोकशाही पद्धतीने नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली.

निवडणुकीत मतमोजणीनंतर मुख्यमंत्री म्हणून प्रेषित बोरकर, उपमुख्यमंत्री शंतनू कांबळे, शिक्षण मंत्री सानिया शेख, पर्यावरण मंत्री मोहिनी गाऊत्रे, आफरीन पठाण, मोहिनी तांबोळी, क्रीडामंत्री संकल्प निखाडे, अल्मास शेख, आरोग्य मंत्री, नैतिक गेडाम, श्रीनिवास गुट्टे, सांस्कृतिक मंत्री म्हणून हिरण्या लाटेलवार, दिग्विजय लटारे, तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री ऐश्वर्या किटे, स्नेहल मेश्राम तर पर्यटन मंत्री भाविक कासमोरे व विद्यार्थी उपमंत्री म्हणून लक्ष्मी शेंडे आणि दक्ष मेश्राम अशा वर्ग 5 वी ते 12 वी तील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली..

या निवडणूक प्रक्रियेत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. आर.गोडशलवार सर, निवडणूक अधिकारी म्हणून श्री पी. डब्लू.उरकुडे सर आणि श्री प्रशांत झाडे सर तर मतमोजणी अधिकारी म्हणून श्री अजय कुरेकर सर यांनी कार्यभार पार पाडला.. सदर नवनियुक्त शालेय मंत्रिमंडळातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य सी. डी. तन्नीरवार सर यांच्याद्वारे शपथ देण्यात आली…

          याप्रसंगी शाळेचे प्राचार्य सी. डी. तन्नीरवार सर, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सहारे मॅडम, पर्यवेक्षक श्री विधाते सर,तसेच शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…