डॉ जिवतोडे यांच्या संभावित भाजप प्रवेशाने रमेश राजूरकरांची डोकेदुखी Dr.jivtode’s possible entry into the bjp is a headache for Ramesh rajurkar

🔸वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात भाजपकडून वाढती दावेदारी अनेकांची गोची

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.8 मार्च) :-जिल्ह्यात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राकडे सगळ्यांच्या नजरा असल्याचे सद्ध्या राजकीय चित्र असून भाजपाकडून येणाऱ्या सन २०२४ च्या निवडणुकीत आपलीच दावेदारी असल्याचे सांगणारे रमेश राजूरकर आता डॉ. अशोक जिवतोडे यांच्या भाजप प्रवेशाने नेमके काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता जर या विधानसभा क्षेत्रात डॉ अशोक जिवतोडे यांनी दावेदारी केली तर मग रमेश राजूरकर यांचा संभावित भाजप प्रवेश होणार होणार की ते परत माघारी फिरणार ? याबद्दलच्या चर्चा रंगणार आहे. डॉ. जिवतोडे यांच्या भाजप प्रवेशाने राजूरकर यांची डोकेदुखी वाढणार असून भाजप मधे होणाऱ्या प्रवेशाने अनेकांची गोची सुद्धा होण्याची संभावना आहे. 

रमेश राजूरकर यांनी मागील तीन साडेतीन वर्षात मनसेचा संभावित उमेदवार म्हणून जनसंपर्क वाढवून आपली चांगली उपस्थिती दाखवली होती पण त्यांचा पक्ष बदलण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत, कारण त्यांना लोकांनी मनसेचा भावी आमदार म्हणून स्वीकार केल्यानंतर पक्ष बदलण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला तो त्यांच्या समर्थकांना देखील पटला नाही, कारण भाजप पक्षाची राज्यात आणि केंद्रात सत्ता असतांना ज्या पद्धतीने जनतेचे प्रश्न ऐरणीवर पडत आहे व हे सरकार भांडवलशाहीच्या बाजूने आहे त्या भाजपकडे सर्वसामान्य जनता मोठ्या संशयाने बघत असल्याने येणाऱ्या निवडणुका भाजपाला कठीण जाण्याचे संकेत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीच्या माध्यमातून समोर आले आहे.

पक्ष बदलण्याचा निर्णय कशासाठी ?

रमेश राजूरकर यांचं चित्र आणि चरित्र जर बघितलं तर ते व्हाइट कॉलर नेता म्हणून परिचित आहे, कारण त्यांची स्वतःच्या भरोशावर आंदोलनकरण्याची धमक नाही आणि ते गर्दी सुद्धा जमवू शकत नाही हे त्यांच्या मागील विराट मोर्च्याच्या माध्यमातून समोर आले आहे. ज्या मनसेत ते होते त्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या पाठीशी नव्हते म्हणजे त्यांच्यात संघटन कौशल्य सुद्धा नाही त्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या भरोशावर आमदार बनायचं आहे हे स्पष्ट होते, आणि म्हणूनच भाजप कडून उमेदवारी मिळाली तर सगळी यंत्रणा ही पक्षाची राहणार असल्याने यांना फक्त उमेदवार म्हणून चांगली संधी असल्याचे वाटते आणि म्हणूनच त्यांना भाजप पक्षात जाण्याची प्रबळ इच्छा आहे. 

भाजपला राजूरकर यांचा काय फायदा ?

रमेश राजूरकर यांना धनोजे कुणबी समाजात मोठा मान आहे व ते या समाजाचे जिल्हाध्यक्ष राहिले असल्याने त्यांच्या माध्यमातून भाजप ला किमान लोकसभा निवडणुकीत दोन चार हजार मतांचा गठ्ठा मिळू शकतो, पण अगोदरच अशोक जिवतोडे सारखे दिग्गज भाजप मधे गेल्याने व पुरुषोत्तम सातपुते सारखे समाजाचे नेते सुद्धा भाजप च्या बाजूने जाणार असल्याने रमेश राजूरकर यांचा फारसा प्रभाव निवडणुकीत होईल असे वाटतं नाही.