प्रभू श्रीरामाच्या आगमनाचे घरोघरी दीपोत्सव करून स्वागत करा….किशोर टोंगे यांचे आवाहन

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.21 जानेवारी) :- प्रभू श्रीरामच्या प्रतिष्ठापनेची उत्सुकता केवळ देशभरातील नव्हे तर जगभरातील रामभकतांना होती. ती वेळी उद्या येत असूनही तिचे घरोघरी दीपोत्सव करून आनंदात साजरा करा असे आवाहन किशोर टोंगे यांनी केले.

प्रभू श्रीराम ही व्यक्ती नव्हे तर आदर्श, संस्कृती आणि अखंड भारतवासियांच्या मनामनात भक्तीचा त्रिवेणी संगम आहॆ असंही ते म्हणाले.

प्रभू श्रीराम हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून ते आपल्या मूळ अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम विराजमान होत आहॆत, हा क्षण आपल्या प्रत्येकासाठी दीपोत्सवचं आहॆ त्यामुळे प्रत्येकाने सायंकाळी आपल्या घरी दीपोत्सव करावा असे आवाहन वरोरा भद्रावती विधानसभेचे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी केले.