किलबिल अनाथाश्रम साजरा केला चिमुकली कशिश चां वाढदिवस

🔸विनाकारण खर्चाचा योग्य उपयोग कूरेकार परिवाराचा नावीन्यपूर्ण उपक्रम

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.30 ऑक्टोबर) :- जिजाईचे वडील म्हणाले की, मोठं मोठे केक कापून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा वाढदिवस साजरा करण्याचे विविध फंडे आजकाल अवलंबले जातात. मित्र व कुटुंबात जेवणावळी, केक कापण्याचा सार्वजनिक सोहळा, फ्लेक्सबाजी, पर्यटनाला जाणे, महागड्या वस्तूंची खरेदी केली जाते. पण या सर्व प्रकाराला फाटा देत प्रत्येकाने जन्मदिनी या अनाथ बालकांना सुखाचा घास दिल्यास निसर्गाचा आशिर्वाद मिळतील.

जास्त नाही एखादा वाढदिवस तरी अनाथ मुलांसोबत अथवा वुद्धआश्रमातील लोकांसोबत साजरा करून बघा. मनाला खूप समाधान भेटेल. त्यांच्या सोबत प्रेमाने दोन शब्द बोलुन बघ ते तुला भरभरून प्रेम देतील इतर दिवस तुला तुझे कुटुंबीय सोडून कोणीही स्मित हास्याने स्वागत करणार नाही. पण तिथे सर्व जण स्मित हास्याने स्वागत करतील.

त्यांचे ते बोलके डोळे आणि निरागस हास्य याची जाणीव करून देईल त्यांच्या नजरेत किती सुंदर आहे हे जग. किती अडचणी असू देत ते हसत हसत धैर्याने सामोरे जातात. तिथे तुला श्रीमंत होण्याची स्पर्धा नाही दिसणार. कि मी कोनापेक्षा किती श्रेष्ठ आहे याची जाणीव करून दिली नाही जाणार. तिथे तू किती पैसे कमावतो या वरून जज नाही करणार. तिथे तू माणूस म्हणून जाशील आणि तिथे माणुसकीने वागवणार. फक्त एक दिवस सवेदनशील होऊन जा मनाला नक्कीच शांती भेटेल…

आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदतरुपी सेवा करुन त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहे.

आश्रमाचे संचालक म्हणाले, मी गेली दहा अनाथांचा सांभाळ करताना काही मोजकेच तरुण इथे येऊन सेवा देत असतात. कारण हा आश्रम तुमचा माझा सर्वांचा आहे, येथील मुलामुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम कोणीतरी येऊन करत असतो.

या वेळी वडील कामेश्वर कुरेकार आई करिश्मा कुरेकार आजोबा प्रभाकर रोडे माई माला रोडे मामाजी प्रमोद डाहुले आत्या विजया डाहुले ताई तनवी डाहुले हे उपस्थित होते.