वंधली येथील एका घराला आग ; सुमारे एक लाखाचे नुकसान

110

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठान न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.2 जानेवारी) :- तालुक्यातील वंधली येथे रामाजी मडावी ह्या शेतकऱ्याच्या घराला रात्रीला अचानक आग लागल्याने त्याच्या घरातील सुमारे 20 क्विंटल कापूस, गादी व सर्व शेती पूर्वी साहित्य तसेच जिवनाश्यक साहित्य जळून खाक झाले असून त्याचा सुमारे एक लाखाच्या वर नुकसान झाल्याचे समजते.

        पहाटे २ वाजता घरचे लोक झोपित असतांना भीषण आग लागल्याने त्यांच्या घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने आता त्या शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळले आहे. आग लागल्यावर सभोवताल च्या लोकांनी आग नियंत्रणात आणली. तसेच काही कार्यकर्त्यानी त्या आगीवर नियंत्रण आणून आग वीझविली.

घराच्या बाजूला असलेल्या म्हातारीचे घरचे सिलेंडर ने सुद्धा पेट घेतला पण सुदैवाने त्वरीत सिलेंडर विजविल्याने घटना टळली. संबधित तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असून त्या शेतकऱ्याला शासनाने नुकसाभरपाई देण्यात अशी मागणी करण्यात येत आहे.