दिव्यांग कल्याण संस्था चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी परमानंद तिराणिक यांची निवड Election of Parmanand Tiranik as District President of Divyang Kalyan Sanstha Chandrapur

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.21 जुलै) :- कला आणि शिक्षण व साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेले तसेच शासनाच्या अशासकीय समितीवर कार्यरत असणाऱ्या शासनाच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजना, बेरोजगारी, दिव्यांगांचे राजकीय सामाजिक पुनर्वसन आदी सर्व प्रश्नांवर प्रकाश टाकून दिव्यांग बांधवापर्यंत पोहचवून दिव्यांगांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी श्री. परमानंद तिराणिक, कलाशिक्षक यांची ‘दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था’ च्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ही निवड दिव्यांग कल्याण संस्थेचे प्रदेश सरचिटणीस श्री. दिपक शेवाळे, नाशिक महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचारी तसेच अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रदीप कोहपरे, ग्यानिवंत गेडाम, जगदीश गेडाम, मनोज गाठले, प्रशांत बदकी, धर्मेंद्र शेरकूरे, गांधी बोरकर, जितेश कायरकर, गौरव ठाकरे , प्रा.निरज आत्राम, प्रा.पोहाणे, वसंत राखुंडे इत्यादी मंडळींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणासाठी येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी मदत करण्यापासून ते त्यांच्या आवडीप्रमाणे त्या शहरात शिक्षण घेण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन ते करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, कला, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील लोकप्रिय आदर्श व्यक्तीमत्व असुन त्यांना आतापर्यंत शंभराहून अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने सन्मानित झालेले आदर्श कलाशिक्षक आहे..