स्वराज्यक्रांती सेवा संघा चे पदाधिकारी तसेच खांदेश कलाकार अजय कुमावत व नरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त गरजु मुलांना कपडे वाटप

✒️जळगाव (jalgaon विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.15 सप्टेंबर) :- अंकुश भाऊ कुमावत युवा मंच प्रणित स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र हे सामाजिक व शैक्षणिक संघटन अनेक दिवसांपासुन समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे.

      स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे जळगाव जिल्हा सदस्य व खांदेश कलाकार अजय कुमावत आणी मालेगाव तालुका अध्यक्ष नरेंद्र जगताप यांचेे वाढदिवस मागे पुढेच असतात, २ सप्टेंबर ला नरेंद्र जगताप तर दुसरी कडे ७ सप्टेंबर ला अजय कुमावत यांचा वाढदिवस असतो, त्यातचं या वर्षी गोकुळ अष्टमी चा योग जुळुन आला, या ञिवेणी योग च्या निमित्त मालेगाव शहरात गरजु बाल गोपाळांना कपडे वाटप करण्यात आले.

     खांदेश सह महाराष्ट्राचे लाडके कलाकार आदरणीय सचिन कुमावत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम मालेगाव शहरात पार पडला, या उपक्रमास अनेक पदाधिकारी व मिञ परिवार उपस्थित होते.

     सध्या महाराष्ट्रात वाढदिवसाची खुप क्रेझ आहे, त्या मध्ये विनाकारण खर्च पार्ट्या होतात, अशा प्रकारे वाढदिवस साजरा नं करण्याचं स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष यांनी वेळोवेळी आव्हान केले आहे, आपण आपले वाढदिवस गरिब गरजु लोकांसोबत साजरा करावा हाच आमचा हेतु असतो.