साप चाऊन विद्यार्थी मुलीचा मृत्यू Student girl dies after being bitten by a snake

129

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क 

 चंद्रपूर(दि.21 जुलै) :- नागभिड तालुक्यात येत असलेल्या चिंधीमाल येथिल बुधवारला पहाटे तीन वाजताच्या दरम्यान झोपेतच सर्पदंशाने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

मृतक मुलीचे नाव अफसरा विलास सुतार (११) असे आहे.ही मुलगी नागभीडच्या एका खासगी शाळेत पाचव्या वर्गात शिकत होती. चिंधीमाल ही वस्ती बहुरुपी यांची आहे.या मुलीचा घर वनालगत व शेता जवळ आहे.

पहाटेच्या सुमारास तिला विषारी सापाने दंश केल्याने ती दचकुन जागी झाली.तेव्हा जवळच झोपलेल्या कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येताच तातडीने तिला उपचारासाठी नागभीड येथे रुग्णालयात आणत असतांनाच वाटेतच मृत्यू झाला.गावात या घटने विषयी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आठ दिवसा अगोदर ओवाळ या गावात वडीला सोबत शेतावर गेलेल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली.त्यांच बरोबर चिंधीमाल येथे दोन दिवसा अगोदर एका महिलेला सर्पदंश झाला.पण ती यातुन बचावली आहे.या परीसरात या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://smitdigitalmedia.com/