मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू A youth who went for fishing drowned in the lake

🔸घोडपेठ तलावातील घटना

 ✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.12 एप्रिल) :- तालुक्यातील घोडपेठ येथील तलावात मासेमारी करता गेलेल्या युवकाचा मासेमारीसाठी वापरण्यात आलेल्या हवा भरलेल्या ट्यूब वरून तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एकच्या दरम्यान घडली या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

 अंकुश रमेश नागपुरे वय २८ राहणार भद्रावती असे मृतकाचे नाव आहे मच्छिंद्र मछुआ संस्थेतर्फे हा तलाव सदस्यांना मासेमारी करिता मंगळवार व बुधवार ला रात्रपाळी करता देण्यात आला आहे. रात्रीला लावण्यात आलेल्या जाड्यातील मासे काढण्याकरिता अंकुश हा आपल्या सहकार्यासोबत तलावात गेला होता.

मासे काढून झाल्यानंतर परतीच्या वेळेस अचानक त्याचा हवा भरलेला ट्युब वरून तोल गेला व तो खोल पाण्यात बुडाला उपस्थित असणाऱ्या सदस्यांना माहिती होतास त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मृत्यू झाला. संस्था स्थापनेपासून मासेमारी करत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली या प्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले . पुढील तपास करीत आहे.