शेगावात रॉयल्टी च्या नावाखाली अव्यध्य मुरमाचे उत्खनन  Excavation of Avyadhya Murma in the name of royalty in Shegaon

🔸महसूल विभागाचे कमालीचे दुर्लक्ष(Gross negligence of revenue department)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.17 जून) :- वरोरा तालक्यातील शेगाव बू येथे गेल्या अनेक दिवसापासून सर्रास मुरमाचे उत्खनन सुरू असून वरोरा चिमूर नॅशनल महामार्ग रस्त्याच्या बांधकाम निर्मिती करिता लागत असल्याचे सांगून सर्रास पणे गावात मुरमाची बेभाव विक्री होत असल्याचे महाभयानक दृश्य पाहायला मिळत असून शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून करोडो रुपयाचा चुना महसूल विभागाला लावत असून येथील काही नागरिक करोडो रुपये कमावण्याच्या मार्गात लागले आहे… 

           सविस्तर असे की वरोरा चिमूर नॅशनल महामार्ग निर्मिती चे बांधकाम सदर एस आर के कंट्रक्षण कंपनी ला सोपविले असून सदर या कंपनीला उपयोगात येणारा मुरूम अत्यंत महत्वाचा असल्याने शेगाव परिसरातून अनेक शेत शिवरातून मुरमाची उचल केली जात आहे ..परंतु रस्त्या निर्मिती करिता हा मुरूम न वापरता सर्रास पने गावात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्याचे दिसून येत आहे.. तेव्हा संबधित विभागाने या कडे अधिक लक्ष केंद्रित करून सदर होणाऱ्या खोदकामाची सखोल चौकशी करून एव्यद्य मुरमाची चोरी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहे .. 

         शिवाय शेगाव येथे गेल्या आठ दिवसपूर्वी अव्यध्य मुरमाची तस्करी करणाऱ्या ट्रक ला रंगेहाथ हात पकडले होते परंतु या ट्रक वर कारवाई न करता परस्पर सोडून दिला असल्याची गावात चर्चा आहे . तेव्हा एव्यध्य खोदकाम करणारे व मुरमाची तस्करी करणारे व महसूल विभाग यांची काही मिली भगत असेल काय .. ? असा सवाल येथील नागरिक करू लागले आहेत.