भूगोल दिवस साजरा करणे काळाची गरज:- अध्यक्ष नरेंद्र कन्नाके

238

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.18 जानेवारी) :-  लोकमान्य कन्या विद्यालय वरोरा येथे मोठ्या उत्साहाने भूगोल दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा.श्री नरेन्द्र कन्नाके सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. धोपटे मॅडम होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पूजनाने झाले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सीमा वैद्य मॅडम यांनी केले.यात प्रामुख्याने अध्यक्ष नरेंद्र कन्नाके सरांचे परिचय व भूगोल विषयाचे महत्व त्याचबरोबर विविध उपक्रम बद्दल थोडक्यात माहिती स्पष्ट केल्या.यानंतर एक – एक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भूगोल विषयक भाषण, गीत, नाट्य छटा , कविता सादर करून भूगोल विषय खरच आवश्यक आहे असे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका सौ. धोपटे मॅडम यांनी विविध प्रश्न द्वारे विद्यार्थांना भूगोल विषयक हितगुज करून भूगोल विषय कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे मत पटवून दिले.अध्यक्ष भाषणात नरेन्द्र कन्नाके यांनी भूगोल दिवस का साजरा केला जातो. बाकी विषयाला जसे महत्व आहे. तेवढेच महत्व या विषयाला पण येण्या करीता आपली आध्यापन करण्याची शैली बदलवून विविध प्रयोग व उपक्रम द्वारे विद्यार्थांना भूगोल विषयक रुची निर्माण करता आली तर नक्कीच या विषयाचा पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल असे आवर्जून सांगितले.मन लावून अभ्यास करायलाच पाहिजे या बद्दलचे उदा. देऊन अभ्यास किती महत्वाचे आहे. हे पटवून दिले. विद्यार्थी उपयोगी माहिती तसेच स्वतःचे कविता,नीरजा काव्य,शेर च्या माध्यमातून जवळपास एक तास बहुमूल्य भाष्य केले.

विविध उपक्रम राबविले तर नक्कीच भूगोल विषय आवडीचा होऊन विद्यार्थी प्रेमी होऊ शकतो म्हणून भूगोल दिवस साजरा करणे काळाची गरज आहे असे प्रामुख्याने अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. धोपटे मॅडम यांनी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख सौ सीमा वैद्य यांनी केले होते.सूत्रसंचालन कु.वाणी व जोगी तर शेवट कु.ढवस हिनेआभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.