चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी Big loss of Chandrapur Lok Sabha Constituency

🔸खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक(The news of MP Dhanorkar’s death is shocking)

🔹वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शोकसंवेदना(Minister of Forest, Cultural Affairs and Guardian Minister of Chandrapur No. Mr. Sudhir Mungantiwar expressed his condolences)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर,(दि.31 मे) :- चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे,त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात ना. श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली.