चंदनखेडा येथे परंपरागत कर्मकांडाला फाटा देत पार पडला आदर्श विवाह सोहळा An ideal wedding ceremony was held at Chandankheda breaking the traditional rituals

321

🔸आचल व क्रिष्णा आदिवासी पद्धतीने विवाह बंधनात माजी उपसरपंच विठ्ठल हनवते व तं.मु.स.अध्यक्ष मनोहर हनवते यांचा पुढाकार(The initiative of former Deputy Sarpanch Vitthal Hanwate and T.M.S. President Manohar Hanwate in Achal and Krishna Adivasi method of marriage)

🔹नवरीनवरदेव बैलबंडि स्वार होऊन पोहचले लग्नमंडपात(The bridegroom rode a bullock cart and reached the marriage hall)

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

 भद्रावती (दि.30 मे) :- तालुक्यातील चंदनखेडा येथे नुकत्याच एका परंपरागत कर्मकांडाला फाटा देत आदिवासी पद्धतीने पार पडलेल्या आचल व क्रिष्णा यांच्या आदर्श विवाहाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

चंदनखेडा गावातील समाजपरिवर्तनाची जान असलेले नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांने चर्चेत असणारे (माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक) आदिवासी समाजातील पुरोगामी विचाराचे विठ्ठल हनवते व तं.मु.स.अध्यक्ष मनोहर हनवते यांनी स्वतः पुढाकार घेत आदर्श विवाह घडवून आणला.

चंदनखेडा येथील रहिवासी माजी उपसरपंच विठ्ठल हनवते व तं.मु.स.अध्यक्ष यांच्या भावाची मुलगी (पुतणी) आचल व वंदना सुरेश हनवते यांची कन्या तसेच चिमूर तालुक्यातील गुजगव्हान येथील सुमित्रा विठ्ठल गायकवाड यांचे चिरंजीव क्रिष्णा यांचा हा आदर्श विवाह मुलनिवासी आदिवासी महासभेच्या विचारधारेतुन पार पडला.

विवाहाच्या लग्नपत्रिकेवर थोर महापुरुषांच्या प्रतिमा आणि आणि त्यांच्या सामाजिक संदेश जसे कि ‘स्वच्छ भारत अभियान’ झाडे लावा झाडे जगवा, आपला शेतकरी जगाचा पोशिंदा, रक्तदान श्रेष्ठदान, नेत्रदान श्रेष्ठदान,’बेटी बचाओ बेटी पढाओ’ ‘पाणी अडवा पाणी जिरवा ‘ ग्रामगीतेतील ओवी छापण्यात आले. कुठलाही मोठेपणा नसलेला ह्या विवाह स्थळी नवरी नवरदेवाचे बैलबंडी नि लग्नमंडपात आगमन झाले.नाचगाणे न करता समाजप्रबोधनात्म संदेश देणारे संगीत ऐकविण्यात आले.

वधू – वरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले.तसेच महापुरुषांनी मानवाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची आठवण करित आदिवासी पाटा म्हणजे आदिवासी गीतांच्या माध्यमातून सहजीवन आयुष्याची सुरुवात केली.

या विवाह सोहळा प्रसंगी उपस्थितांनी अक्षता येवजी फुलांचा वर्षाव करुन नवदाम्पत्यांना शुभआशिर्वाद दिले. यावेळी हनवते व गायकवाड कुटुंबियांनी परस्परांचा सत्कार केला. माजी उपसरपंच विठ्ठल हनवते व तं.मु.स.अध्यक्ष मनोहर हनवते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतानां म्हणाले की आदिवासी विवाह पद्धतिने आपल्या समाजाने अनुकरण केले पाहिजे.

आचल व क्रिष्णा यांच्या पालकांनी मुलनिवासी आदिवासी महासभेच्या विचारधारेनुसार हा विवाह करण्याचा प्रस्ताव स्वीकारल्या बद्दल त्यांनी कृत्रज्ञता व्यक्त केली.संपूर्ण अतिथी मंडळींना पंगतीचे जेवण देण्यात आले. यातुन अन्न बचतिचा संदेश देण्यात आला.कुठलीहा बडेजाव न दाखविता अत्यंत साधेपणाने हा लग्न सोहळा पार पडला.