राष्ट्रीय बंजारा परिषदेची राळेगाव तालुक्यात सहविचार सभा संपन्न,शेकडो समाजबांधवांनी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले

52

🔸सौ.अलंक्रितताई राठोड यांचा यवतमाळ वाशिम लोकसभेत विजय करूण दाखविण्याचा केला संकल्प

✒️ यवतमाळ (Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.2 मार्च) :- 1मार्च रोजी धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या द्वारे उभारल्या गेलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषद व या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.विलासभाऊ राठोड यांच्या विचाराला अनुसरून या सामाजिक संघटनेची राळेगाव तालुक्यात सहविचार सभा पार पडली.या बैठकित रूपेशभाऊ जाधव( तांडा वस्ती योजनेचे सह संयोजक),राज्य संघटक किसनभाऊ जाधव,विदर्भ संघटक निलेशभाऊ राठोड,यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोर बाळुभाऊ राठोड,अंबादास जाधव व काजलताई रूडे व ऊमेशभाऊ पवार या प्रमुख मंडळींनी *ऊपस्थीती लावली,या बैठकित राज्य संघटक किसनभाऊ जाधव यांनी सांगीतले कि राष्ट्रीय बंजारा परिषद ही धर्मसत्ता मजबुत करण्याच्या कामा सोबत राजसत्ता व तांडा सक्षमीकरणासाठी काम करणारी संघटना आहे.

तांड्यातील व्यसन मुक्ती,शैक्षणीक सोई सुविधा व आरोग्य व्यवस्था यावर काम करणारी संघटना आहे व संपूर्ण देशातील बंजारा बांधवांना ऐका सुचित आणुन वन नेशन वन आरक्षण हे अभियान सुरू करून समाजाला न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे व राजसत्तेत बंजारा उमेदवारांना ताकत देण्याचे काम आम्ही करणार आहोत व जो मतदार संघ बंजारा बहुल आहे त्या मतदार संघात बंजाराच खासदार व बंजाराच आमदार व्हायला पाहिजे *याकरिता आपण सर्वांनी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे व याच दरम्यान मा.सौ.अलंक्रितताई राठोड यांना जर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची ऊमेदवारी मिळाली तर आपण सर्व ताईंना विजयी करण्याचा संकल्प करू याच दरम्यान अलंक्रितताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है चा नारा घुमला.

या बैठकित तांडा वस्ती योजनेचे सह संयोजक रूपेशभाऊ जाधव यांनी सांगीतले कि तांड्यातील लाभार्थी लोकांना घरकुल,राशन कार्ड,निराधार योजना व ईतर शासकिय सवलती पोहचविण्याचे काम मी करणार आहे तुम्ही मला आवाज द्या यादी द्या तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोर बाळुभाऊ राठोड यांनी धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या कार्याची पुर्ण माहिती समाजबांधवांना दिली व माझ्या नेतृत्वाखाली मी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व प्रत्येक तांड्या तांड्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेला पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे व आज राळेगाव नगरीत येवढा मोठा जन प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ताराचंद पवार यांनी केले व आभार प्रदर्शन ओंमकारभाऊ चव्हान यांनी केले.

 या बैठकिला संगीताताई राठोड नेर महीलाध्यक्ष,संदिपभाऊ जाधव,साहेबराव पवार,रमेशभाऊ राठोड,आकाश जाधव,कवडु राठोड,अक्षय राठोड,गुलाब जाधव,अनिल भाऊ जा़व,मेघराज भाऊ राठोड,विनोद भाऊ राठोड,बाबुलाल राठोड,संगीत राठोड,संजुभाऊ राठोड,यौगेशभाऊ राठोड,बलदेव राठोड,प्रकाश राठोड,रंजित जाधव,धनराज राठोड,रामु राठोड,आत्माराम जाधव,सुनिता जाधव,जयदेव राठोड,प्रेमदास जाधव,विजय भाऊ राठोड,सुनिल राठोड,डोमा राठोड,प्रमोद राठोड,प्रकाश राठोड,किशोर राठोड,मोहन पवार,विजय आडे,शेखर जाधव सह शेकडो पदाधिकारी व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.