✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.29 मार्च) :- श्री साई मंदिर देवस्थान मालवीय वार्ड च्या वतीने दरवर्षी प्रमाणे तीन दिवशीय 29,30,31 ला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते 30 मार्च रोजी श्री साई मंदिर मालवीय वार्ड येथून वरोरा शहरात शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे साई उत्सव निमित्त लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराला लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर येथील डॉक्टर अपर्णा सांगोळे श्रुती वाघमारे वैभव पाटील निकिता सुलाखे सुमित खोब्रागडे नरेश सहारे उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला श्री साई मंदिर देवस्थान मालवीय वार्ड वरोरा अध्यक्ष विलास नेरकर उपाध्यक्ष मंगल पिंपळ शेंडे ,सचिव देवराव पारखी तथा 24 तास सेवा ग्रुप पदाधिकारी व सदस्यांनी तसेच वार्ड वासियांनी सहकार्य केले.
