बोडखा मोकाशी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti celebration at Bodkha Mokashi

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.2 जून) :- वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती व धनगर समाज महासंघ तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला वंदन करण्यात आले.

राधा रवी तुराळे या बालकन्याने हातात पिंड घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेष भुषा साकारली. समस्त अहिल्याभक्तांनी यळकोट यळकोट जय मल्हार नारे लावत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे संचालन उत्सव समिती चे आयोजक गणेश चिडे, प्रास्ताविक महासंघ चे अध्यक्ष दिलीप तुराळे व आभार प्रदर्शन अहिल्याभक्त उज्वला तुराळे यांनी केले.

कार्यक्रमाला सहकार्य उत्सव समिती चे सदस्य पुरुषोत्तम तुराळे,सचिन चिडे,प्रकाश तुराळे राहुल तुराळे, मेघनाथ तुराळे, सागर तुराळे,समीर तुराळे, गौरव चिडे, राजू तुराळे, शुभम तुराळे, रोशन तुराळे, हनु तुराळे, आकाश तुराळे यांनी केले. त्यावेळी ग्रामपंचायत स्तरावर अहिल्याभक्त शिलाताई उत्तम तुराळे व दिपालीताई नरेश किन्नाके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे उत्सव समिती ने यांचं पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यावेळी सुवर्णा तुराळे, संगीता तुराळे,रेखा चिडे, योगिता तुराळे, सुनंदा तुराळे,सोनु भोयर, मिना तुराळे, वैशाली तुराळे, पार्वता हुलके,शीतल तुराळे, पल्लवी तुराळे, साईली उगे, उन्नती तुराळे, इशिका चिडे, सुरेखा तुराळे, पूनम तुराळे, कल्याणी तुराळे या सर्व अहिल्याभक्त उपस्थित होत्या.

अहिल्यादेवीचं इतिहास खुप मोठा असुन धर्म रक्षनासाठी व जनतेच्या हितासाठी अहिल्यादेवीच कार्य खुप महान आहे अशे व्यक्तव अहिल्याभक्त गणेश चिडे यांनी म्हटले.