भद्रावती येथील मच्छिंद्र मच्छुवा सहकारी संस्थेवर भगवा फडकला Saffron flew over Machchindra Machhuwa Cooperative Society in Bhadravati

🔹श्री वाल्मिकी मत्स्य विकास सहकार पॅनलचे ११ पैकी ९ उमेदवार आले निवडून(9 out of 11 candidates of Shri Valmiki Matsya Vikas Sahkar Panel got elected)

🔸वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे व नरेन्द्र पढाल यांना दिला जनतेने कौल(People voted for Varora-Bhadravati assembly chief and social activists Ravindra Shinde and Narendra Padhal)

 ✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.15 मे ) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची भद्रावती येथील मच्छिंद्र मच्छुवा सहकारी संस्था मर्यादित भद्रावती र.नं. ७८४ संस्थेची वरोरा–भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल व भोई समाज सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात पंचवार्षिक निवडणूक पार पडली. 

दिनांक १४ मे ला पार पडलेल्या निवडणुकीत श्री वाल्मिकी मत्स्य विकास सहकार पॅनलचे ११ पैकी ९ उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे बहुमतात असलेल्या रवींद्र शिंदे यांच्या गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

सर्वसाधारण गटात शंकर बंडुजी कामतवार, श्रीराम बुधाजी नागपुरे, मधुकर गंगाराम पचारे, सुधाकर पैकू मांढरे, सुरेश माधव मांढरे, सर्वसाधारण महिला राखीव गट संगीता अजय नागपुरे, मंदा प्रकाश मांढरे, विमुक्त जाती/ भटक्या जमाती गट दिलीप किसन मांढरे, अनुसूचित जाती/ जमाती गट राजेंद्र नामदेव बगडे असे संचालक मंडळातील संचालक निवडूण आलेत नावे आहेत. विजयी सर्वाचे मातोश्री सुषमाताई शिदे यांनी अभिनदंन करुन मतदाराचे आभार मानण्यात आले.

या निवडणुकी करीता गुरुजी फाऊंडेशनचे संजय तोगट्टीवार, प्रशांत कारेकर,  गौरव नागपुरे, गोपाल मांढरे, अशोक नागपुरे, बंडू कामतवार,प्रफुल मांढरे,गणेश कामतवार शुभम पचारे, पवन मांढरे, संजय पचारे, सूरज नागपुरे,सृजन मांढरे, अरुण नागपुरे, आनंदराव मांढरे, डॉ. नब्बु दाते, संजय मांढरे, अजय मांढरे, आदींनी परिश्रम घेतले.

निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पांडे व चमू यांच्या मार्गदर्शनात पार पडली.