नागभीड येथे शिवटेकडीच्या पायथ्याशी महाशिवराञी पासुन भरणार उत्सवाचा मेळा

🔸आम.किर्तीकुमार भांगडीया यांचा पुढाकार

✒️ चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 चंद्रपूर (दि.10 फेब्रुवारी) :- जिल्ह्यातील नागभीड   येथील सुप्रसिध्द असलेले महादेव तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी महाशिवराञी दिवशी परीसरातील हजारो भाविक नागभीड येथिल शिवटेकडी वरील पुरातन शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची रिघ लागत असते.

त्यानिमीत्याने पंधरा दिवस शिवटेकडी च्या पायथ्याशी उत्सवाचा मेळा भरत असतो. यासाठी गेल्या पाच वर्षापासुन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचा पुढाकार असुन यावर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.त्यासाठी आमदार भांगडीया यांनी नियोजन केले आहे.१८ फरवरी ते २मार्च पर्यत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

महाशिवराञी च्या दिवशी भाविकांना खिचडीचे वाटप होणार आहे.त्याच बरोबर भव्य नंदी रथ याञा काढण्यात येणार आहे.राममंदीर ते शिवटेकडी पर्यत आकर्षक विघुत रोषनाई राहणार असुन मोठ्या स्वरुपात आनंद मेल्याचे आयोजन केलेआहे.त्याचबरोबर २३ फरवरीला रोग निदान शिबीर,२४ फरवरीला सांयकाळी सहा वाजता राजा शिव छञपती यांचे महानाट्य,२५ ला नवीन प्रभाकर आणी संच स्डाँप काँमेडीअन,२६ ला चला हवा येऊ द्या या भाऊ कदम यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गुरुवार आठवडी बाजार भरविण्यात येणार आहे.

सर्व आयोजित भरगच्छ कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी परीसरातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्यापारी संघटना,सुप्रभात मानिर्ग वाँक संघटना, व विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच भाजपाचे पदाधिकारी वसंत वारजुकर,संतोष रडके,गणेश तर्वेकर,अवेश पठाण,सचिन आकुलवार,शिरीष वानखेडे,राजु पिसे,आनंद भरडकर आदीनी आवाहन केले आहे.