सामाजिक न्याय पर्व निमित्य महात्मा जोतिबा फुले जयंती कार्यक्रम Mahatma jotiba phule jayanti program on the occasion of social justice festival

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.12 एप्रिल) :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्व संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर द्वारा 

आज दिनांक 11/4/2023 ला धनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर संचालित घमाबाई प्राथ/माध्यमिक (निवासी) आश्रम शाळा बरांज तांडा ता.भद्रावती येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्य आयोजित सामाजिक न्याय पर्व उपक्रम दिनांक 1/4/2023 ते 1/5/2023 प्रयन्त आयोजित उपक्रमा अंतर्गत आज क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री पी.एफ. पवार सर ,श्री डी.के. पवार सर बार्टीचे समतादूत श्री गणेश हनवते व पालकवर्ग श्री विलास भोयर तसेच शाळेचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकोत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी एस राठोड सर यांनी केले तसेच समतादूत गणेश हनवते यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनचरित्रवर मार्गदर्शन करून सामाजिक न्याय पर्वाचा उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच शाळेचे मुख्याध्यापक पवार सर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा उलगुळा केला व त्याचा सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला 

सामाजिक न्याय पर्व उपक्रमा अंतर्गत शाळेमध्ये निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा,गायन स्पर्धा घेण्यात आल्या व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शेंडे सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता केली.