सोयाबीन पिकांवर वेगवेगळ्या अळ्यांचा प्रादुर्भाव

🔹कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करा.शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.8 जुलै) :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे.सोयाबिन पेरणी झाल्या बरोबर सोयाबीन पिक जमिनीच्या बाहेर येत नाही.तर अनोख्या वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.या अळ्यां सोयाबीन पीकांचे पाने कात्रू लागली आहे.सोयाबिन पिकावर अनोख्या अळ्याचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी वेगवेगळ्या प्रकाच्या महागड्या औषध फवारणी करीत आहे.बऱ्याच शेतकऱ्यानी दोन ते तिन वेळा फवारणी केली आहे.त्यामुळे त्याचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे.

सोयाबिन पिक पेरणी ककेल्या बरोबर पंधरा दिवस बरोबर झाले नाही तर सुरुवातीला मोठ्या प्रमाणात अळ्या आल्याने जर जास्त खर्च झाल तर अजून सोयाबिन कापणी करण्या पर्यत किती खर्च येईल असा प्रश्न शेतकऱ्या पुढे पडला आहे.त्यासाठी जिल्हातील कृषी विभागाने जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योग्या अळ्याचे योग्य निदान करुन शेतकऱ्याना योग्या मार्गदर्शन करुन औषधाबदल मार्गदर्शन करण्यात यावे .अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यानी केली आहे.