🔸फुले एज्युकेशन तर्फे यवतमाळचे सत्यशोधक माया व डॉ.ज्ञानेश्वर गोरे सन्मानित(Maya and Dr. Dnyaneshwar Gore honored by Phule Education)
✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे (दि .15 मे ) :- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन तर्फे महात्मा दिनानिमित व सत्यशोधक समाज स्थापना दिन शताब्दी सुवर्ण महोसत्वी वर्षानिमित्त गेली ३० वर्षापासून सत्यशोधक चळवळी साठी मोठे योगदान देऊन अनेक सत्यशोधक विवाह यवतमाळ व विदर्भ परिसरात लावले तसेच सत्यशोधक गोलमेज परिषदचे कोव्हीड पूर्वी सलग १० वर्ष आयोजन केले म्हणून महात्मा फुले सत्यशोधक विध्यापीठ यवतमाळ चे संस्थापक दप्तनिक सत्यशोधक माया व ज्ञानेश्वर गोबरे यांचा बहुद्देशीय सत्यशोधक केद्रात दि.१२ मे २०२३ रोजी रात्री ८ वा. थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फोटोप्रेम .
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी ,हिन्दी ,इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ग्रंथ आणि दीनांची साउली व ऐतिहासिक शूर महिला हे ग्रंथ संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक आशा व रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते भेट देऊन एकत्रित दोघांना महात्मा फुले उपरणे पाघरून गौरव करण्यात आला. यावेळी त्याचा मुलगा इंजिनिअर अमेय गोरे , सुन इंजिनिअर प्रियांका गोरे व सौ .जयश्री चांदुरे उपस्थीत होते.
यावेळी सन्मानास उत्तर देताना डॉ .गोबरे म्हणाले की आम्ही पती पत्नी ने विदर्भात सत्यशोधक चळवळीस योगदान दिले म्हणून पुणे येथील आपल्या संस्थेने आमचा जो सन्मान कुटुबाचे साक्षीने केला त्याबद्दल प्रथम आभार व्यक्त करतो. या अशा सत्कारामुळे म्हणा चळवळीच्या कार्यामुळेच मी मोठी भव्य इमारत उभी करून महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ ,यवतमाळ भारतात प्रथम उभे केल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे.
या विद्यापीठाचे माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे मार्गदर्शन ,रोजगार ,व्यवसाय ,तसेच संविधान जागृती ,महापुर्षांचे आचार विचार ,जनजागृती ,प्रबोधन करण्याचे महाकेंद्र चालवीत आहे. पुढे गोबरे म्हणाले की सत्यशोधक चळवळीसाठी तरुण पिढीने पुढे येऊन सत्यशोधक चळवळीची कास धरली पाहिजे या साठी आम्ही मोफत निवासासह शिबीर वेळोवेळी आयोजित करीत असतो. त्याचा लाभ तरुण पिढीने (वय वर्ष १८ ते २२ ) घ्यावा .मात्र त्यांनी स्वखर्चाने यवतमाळ येथे येणे अपेक्षित आहे.
कार्यक्रमाचे आयोजन आकाश ढोक यांनी केले तर सत्याशोधिका आशा हीने सत्याचा अखंड गायला आणि आभार क्षितीज ढोक यांनी मानले.
