चंदनखेडा नदीतून शेगाव परिसरात खुले आम रेती तस्करी Open sand smuggling in Shegaon area from Chandankheda river

358

🔹महसूल विभाग व पोलिसांच्या डोळ्यात धूळ(Dust in the eyes of the revenue department and the police)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.15 मे ) :- येथून जवळच असलेल्या चंदनखेडा परिसरात सर्रास पने रेतीची दीन दहाडे तस्करी होत असून या कडे संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडत असल्याचे महा भयानक चित्र पाहायला मिळत आहे . विशेष म्हणजे शेगाव येथून जवळच असलेल्या बोरगाव धांडे येथील ऐव्यद्य रेती तस्कर अनेक दिवसपासून संबंधित विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून रेतीचीं चोरी करून लोखो रुपये कमावण्याच्या मार्गात लागले आहेे.

तसेच गोर गरीब जनतेला बेभाव रेती विक्री करून त्यांची देखील फसवणूक करून त्यांना एक ट्रॅक्टर च्या नावाखाली त्यांना पाऊण ट्रॅक्टर ट्रॉली टाकली जात असल्याने गरीब जनता आरडा ओरड करीत आहे देखील सुध्दा बोरगाव धांडे येथील इसम कुणालाही न जुमानता तसेच संबधित विभागाला खिशात ठेवल्या प्रमाणे वागत असून यांच्या गाड्या रेतीने भरलेले ट्रॅक्टर भर वेगाने जात असून या वाटेवर कुणीही आले तर त्याने वाहन खाली जिवे मारण्याचा भयंकर प्रकार करीत असल्याचे नागरिक सांगत आहे तेव्हा अश्या जीव घेण्या रेती चोरट्यावर तस्करावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे .

भद्रावती तालुक्यात येत असलेल्या महसूल विभाग तसेच पोलीस स्टेशन व शेगाव पोलीस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या खुलेआम रेती ट्रॅक्टर च्या साहाय्याने चोरी केली जाते. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा जवळील घाटावरून खुलेआम शेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात रेतीची तस्करी करण्यात येते. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवल्या जातो. पण याकडे मात्र महसूल विभागाचे अधिकारी जाणुन बुजून काना डोळा करतांना दिसून येतात. कधी जरी कारवाही झाली तरी चिरिमिरी घेऊन गाड्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळते.

शिवाय यांची वाहने भर दिवसा अतिवेगाने धावत असतात व वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्यास वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात.

शिवाय रेती तसकरी करणाऱ्या या वाहणाला मागील व समोरील बाजूस नंबर प्लेट सुद्धा नसते तरी या वाहणावर कारवाही मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे एरवी नियमाला जागणारे वाहतूक कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी या रेती तस्करावर एवढे मेहरबान का? व यांची काही विशेष मेहरबानी तर रेती तस्करावर नाही ना? भरधाव वेगाने धावणाऱ्या यांच्या वाहनाने एखादा अपघात झाल्यास याला जवाबदार कोण? असा प्रश्न सर्व गावकऱ्यांना पडला आहे.