पाचगाव ठा.येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

वरोरा (दि.18 मे) :- तालुक्यातील पाचगाव ठा.येथे श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिर समिती टेंमुर्डा त.वरोरा द्वारा आयोजन करण्यात आले. शिबिराचे हे दुसरे वर्ष असून आयोजक सर्वश्री जनार्दनजी देठे प्रमुख मार्गदर्शक, माणिक डुकरे व्यवस्थापक, शामरावजी काळे अध्यक्ष,हितेश गुगल उपाध्यक्ष,मनोज ढोके सचिव,आशिष माणूसमारे शिबिर नियोजन प्रमुख, अमित निब्रड संपर्कप्रमुख,शैलेश खिरटकर सह संपर्कप्रमुख व सदस्य अशोकराव भोंग,रामदासजी बारतीने, भारतराव ठावरी,यजमान सातपुते, कवडूची आत्राम, यांनी केले असून कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक १६ मे २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. बोंडे व अध्यक्ष धनराज आस्वले, प्रमुख पाहुणे अंकुश आगलावे,केशव महाराज खिरटकर, वाल्मीकराव वैद्य, नामदेव काळे,किरण ढोक सरपंच डॉ. अमित झिले होते.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत सांगितलेल्या प्रमाणे बालकांना योग्य संस्कार पडावे, समाजाविषयी प्रेम निर्माण व्हावं, महापुरुषांची आदर्श ठेवून राष्ट्रसंताचे विचार घेऊन शिबिरातून विद्यार्थी घडावा अपेक्षा ठेवून दि.१६ ते २६ मे २०२४ पर्यंत शिबीर आयोजित केले. आदर्श होतील विद्यार्थी गण | गावाचे पालटेल जीवन || कोठेच न उरेल गावंढळपण | टिकाऊ परिवर्तन या मार्गे || ग्रामगीता शिबिरातील विद्यार्थ्यांना दैनंदिन कार्यक्रम हे प्राप्तस्मरण, प्राप्तविधी,सामुदायिक ध्यान,योग प्राणायाम, भक्ती संगीत, टाळ खंजिरी तबला हार्मोनियम भजन गायन इ. बौद्धिक सत्र संत ग्रंथांचा अभ्यास भोजन विश्रांती ग्रामगीता व राष्ट्रसंतांच्या तसेच इतर थोर महापुरुषांच्या वाङ्मयाचा अभ्यास पाठांतरांचा अभ्यास मैदानी खेळ लाटी काठी कुस्ती कराटे मलखांब लेझीम इ. परिसर स्वच्छता सामुदायिक प्रार्थना भोजन राष्ट्रवंदना अशा प्रकारे बालसुसंस्कार शिबिराचे कार्यक्रम ठेवून आयोजन केले आहे .

या शिबिरात प्रशिक्षकांची भूमिका साकार करणारे स्वप्नील कुथे, करण नेवारे , गौरव राणे, लोकेश जीवतोडे, अमर निखाडे , यश झाडे, गोकुळ आत्राम , अनिकेत ढुकसे शुभम आमने, वेदिका भोयर, हे सर्व सेवा देत आहे. गावातील पुढाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी तसेच गुरुदेव सेवा मंडळाने शिबिरार्थ्यांना मोफत भोजन, नास्ता, आर्थिक स्वरूपात सुद्धा अश्या विविध सुविधा व मदत केली आहे.