कु. माधुरी शिवदास उईके वय १२ वर्षे ०२ महिने, कु. नंदिनी शिवसाद उईके वय ११ वर्षे ०५ महिने व कु. मुस्कान शिवसाद उईके वय ०८ वर्षे ११ महिने या तीन बहिणींसाठी बाल कल्याण समिती, अमरावती यांचे आवाहन Mrs. Madhuri Shivdas Uike Age 12 Years 02 Months, Ms. Nandini Shivsad Uike age 11 years 05 months and Ms. Appeal of Child Welfare Committee, Amravati for three sisters Muskan Shivsad Uike age 08 years 11 months

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.15 मे ) :- प्रवेशित तीन बहिणी कु. माधुरी शिवदास उईके वय १२ वर्षे ०२ महिने, कु. नंदिनी शिवसाद उईके वय ११ वर्षे ०५ महिने व कु. मुस्कान शिवसाद उईके वय ०८ वर्षे ११ महिने या बहिणींच्या वडिलांचा मृत्यू झाला असून सदर बालिकेंची आई कोणालाही काहीही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे.

सदर बालिकेंचा पत्ता मु. पो. शहापूर, ता. वरुड, जि. अमरावती, तसेच सदर बालिका या बिरसा मुंडा आदिवासी आश्रम शाळा, वरुड, ता. वरुड, जि . अमरावती येथे शिकत होत्या. सध्या सदर तिन्ही बहिणींना काळजी व संरक्षणासाठी बाल शिक्षण केंद्र (मुलींचे बालगृह), अमरावती येथे दाखल करण्याचे आदेश दिले. (आदेश क्रमांक १२७४/ दि. ०३/१२/२०२२). 

   प्रवेशित तीन बहिणी कु. माधुरी शिवदास उईके वय १२ वर्षे ०२ महिने, कु. नंदिनी शिवसाद उईके वय ११ वर्षे ०५ महिने व कु. मुस्कान शिवसाद उईके वय ०८ वर्षे ११ महिने या बहिणींच्या आईला व नातेवाईकांना आवाहन करण्यात येथे कि त्यांनी निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांच्या आता बाल शिक्षण केंद्र (मुलींचे बालगृह), अमरावती-४४४६०२ येथे ७२६१९६०९३४ या नंबरवर किंवा बाल कल्याण समिती, अमरावती किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अमरावती किंवा वरुड पोलीस स्टेशन, वरुड, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा.

दिलेल्या कालावधी मध्ये संपर्क न केल्यास बालीकांचे सर्वोत्तम हित लक्षात घेता ह्या बालिकांचे पुनर्वसन केल्यावर कोणाचाही दावा राहणार नाही ह्याची दखल घ्यावी.