अपघातात एक ठार तर एक जखमी One killed and one injured in the accident

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.31 जुलै) :- ब्रम्हपुरी वरून स्वगावी जात असताना मालडोंगरी ते चकबोथली दरम्यान दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने भीषण धडक दिली , यामध्ये दुचाकीवरील एक इसम जागीच ठार झाला तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला आहे. 

              मृतकाचे नाव रामचंद्र बक्षी मैंद (45) रा. चकबोथली तर जखमी चे नाव मोहन रामचंद्र सहारे (50) रा.काटली चक असे आहे. जखमी ला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

            मृतक रामचंद्र व मोहन हे काही कामानिमित्त ब्रम्हपुरी ला आले होते. स्वागवी परत जात असताना सदर अपघात घडला.