✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती ( दि.7 मे ) :-
वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील वरोरा व भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक व संचालिका यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) नेते खा. संजय राऊत व खा.अनिल देसाई यांची नुकतीच मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी शिवसेना (ठाकरे) गटातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलचे भद्रावती कृउबा समीती नवनिर्वाचीत संचालक मोहन व्यंकटी भुक्या, ताजने भास्कर लटारी, डुकरे ज्ञानेश्वर राजाराम, आगलावे मनोहर शत्रुघ्न, घुगल विनोद बापुराव, जांभूळकर शरद महादेव, तिखट भास्कर लटारी, उताणे गजानन दीनाजी, अश्लेषा शरद जीवतोडे, शांताबाई लटारी रासेकर, ताजने परमेश्वर सदाशिव, शामदेव गणबाजी कापटे तसेच शेतकरी सहकार परीवर्तन आघाडी वरोरा कृउबा समीती नवनिर्वाचीत संचालक देवतळे डाॅ. विजय रामचंद्र, टेमुर्डे जयंत मोरेश्वर, बोरेकर दत्ता बबनराव.
भोयर विठ्ठल त्र्यंबकराव, पावडे अभिजीत गिरीधर, टोंगे कल्पना ओकेश्वर, उरकांदे संगिता वासुदेव, देवतळे राजेश वामणराव, झिले विलास शालिक यांनी खा. संजय राऊत व खा. अनिल देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेतली. नवनिर्वाचित संचालकांसह उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, राष्ट्रवादीचे नेते जयंत पा. टेमुर्डे, भद्रावती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, वरोरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष खेमराज कुरेकार, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर.
भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी संचालक वासुदेव ठाकरे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, राजेश पा. देवतळे, अखील भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रदिप महाकुलकर, सरपंच बंडू नन्नावरे, उपसरपंच मंगेश भोयर, सुबोध तिवारी, डाॅ. नरेन्द्र दाते.
वरोरा व भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित वरोरा व भद्रावती कृउबा समितीचे नवनिर्वाचित संचालक व संचालिका, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे खा. संजय राऊत व खा.अनिल देसाई यांनी अभिनंदन केले.
