खगोल प्रेमींनी पाहिले ५ मे चे छायाकल्प चंद्रग्रहण Astronomers witnessed the May 5 lunar eclipse

119

🔸पावसाने व्यत्यय न आणल्याने खगोलप्रेमी आनंदी(Astronomers are happy as the rain did not interfere)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.6 मे ) :-  

        ५ मे रोजी भारतातून दिसलेले छायाकल्प चंद्रग्रहण पावसाने व्यत्यय न आनल्याने देशातील आणि विशेषतः विदर्भातील खगोल प्रेमींना चांगल्या पद्धतीने पाहता आले.स्काय वॉच ग्रुपने ग्राहणाची माहिती आणि पाहण्यासाठी आवाहन केले होते.

     .भारतातुन दिसलेले हे ह्या वर्षीचे पाहिलेच ग्रहण असल्याने बहुतेक लोकांनी ह्या ग्रहणाचा निरीक्षण करून आनंद साजरा केला.ह्या ग्रहनात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून (Penumbra)गेला असल्याने चंद्र किंचित अंधुक होताना पहिला.पृथ्वीची गडद छाया डावीकडे असल्याने चंद्राची डावी बाजू जास्त काळी जाणवत होती म्हणूनच त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात.अगदी असेच चित्र ५ मे रोजी रात्री आकाशात पहायला मिळाले.

*ग्रहण कसे घडते*

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येते तेव्हाच चंद्र-सूर्य ग्रहणे होतात.चंद्र ग्रहनवेळी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि म्हणून पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावली असतात.गडद सावली आणि उपछाया .गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उप छायेतून गेल्यास छायाकल्प चांद्रग्रहण घडते.

     हे छायाकल्प चंद्रग्रहन याआशिया,आस्ट्रेलिया,युरोप,पूर्व आफ्रिका,पेसिफिक,इंडीयन आणि अटलांटिक महासागरातून अनेकांनि पाहिले.भारतातून ग्रहनाला स्थानिक वेळेच्या फरकाने भारतीय वेळेनुसार ८.४४ वाजता सुरवात झाली.ग्रहणमध्य १०.५२ तर ग्रहण समाप्ती १.१ वाजता झाली.स्काय वॉच ग्रुपच्या आवाहनानंतर विदर्भातील लाखो नागरिक,विध्यार्थ्यांनि छायाकल्प चंद्र ग्रहण निरीक्षण केले.

     प्रा सुरेश चोपणे

अध्यक्ष-स्काय वॉच गृप