आदीवाशी पारधीसमाजाचे संत ज्ञानदेव शिल्लकदार भोसले काळाच्या पडद्या आड प्रत्येकाला गर्व वाटेल अशा बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली ..पोलिस महानिरीक्षक डाॅ दिलीप भुजबळ पाटील

✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.17 जानेवारी) :- पिढीतांचे आसू पुसण्यासाठी स्वतःचे सुख त्यागुन दुस-याचे दुःख कमी करण्यासाठी आपल्या मुलाला पाठवणारे थोर बाबास भावपूर्ण श्रद्धांजली …हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर महान मंदिर आहे.

हसणा-या चेह-यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणा-या हृदयावर विश्वास ठेवावा”

कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते अगदी तसेच तीर्थरूपी बाबा ज्ञानदेव यांची कारकीर्द पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी राहिल असे मत. दिलीप भुजबळ पाटील यांनी व्यक्त केले.

 निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे,आयुक्त नितीन पाटील, पद्मश्री.डाॅ.रविंद्र कोल्हे,पोलीस महानिरीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ,पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,ऑड. अनिल तांबे,पोलीस महानिरीक्षक संदिप पाटिल,पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी,पोलीस महानिरीक्षक बी.जे.शेखर पाटील,पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,पोलीस अधीक्षक अनिकेत गोयल,पोलीस अधीक्षक सुनील कडासने,माजी पोलीस महासंचालक सुरेष खोपडे,उद्योगपती सतिश कोकाटे, जिल्हा अधिकारी डाॅ.राजेश देशमुख,तहसीलदार.ऋषिकेश शे॓ळके ,पोलीस निरीक्षक शषिकांत चव्हाण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.

आयुष्य कोणासाठी जगावे ते तुम्हाला आम्हांला कोरोणा सारख्या आजाराने शिकवावं हे दुर्दैव .!काही लोक आपल्या जीवनाचा रस्ता चुकतात ते नोकरीला लागताच स्वताचे आयुष्य आनंददायी जगण्यासाठी आपल्या घरच्या नात्याला व गरिबील मित्रानां आणि ज्या समाज्यात जंन्माला आले त्या समाजाला विसरून जातात..तेच लोक पुढे कामावरून रिटायर झाल्यानंतर आपले लोक शोधण्यासाठी वनवन भटकंती करतात.

परंतु ज्यांच्याकडे काहीच नाही तरी देखील आपले आयुष्य पिढीत समाजाला चिखलाच्या खायेतून बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस धडपडतात महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जाऊन प्रत्येक गरीब कुटुंबाच्या दुःखात धावून जातात त्यांच्या चेहेऱ्यावर हसू आनतात 80ते85हजार लोकांना गुन्हेगारीच्या चिखलातून बाहेर काढतात स्वाभिमानाने गाववेस्तेत न्याय मिळवून देतात असे एक रुपया विना जिवन जगण्याच वृत्त बाळतात असे आमंचे बंधू आदिवासी सेवक व साहित्यिक.नामदेव भोसले यांच्यासाखे समाजसेवक फार कमी असतात .

ज्यांनी आपले आयुष्य समाजहितासाठी व समाजातील पिढीत लोकांचे दुःख कमी करण्याकरता वाहून जिवन वाहुन घेतले..त्यांचे बंधू तुकाराम, भास्कर, नामदेव,सुनिल,यांनी आपल्या बाबांचे स्वप्न पुरे केले आहे, थोर आदिवासी समाजसेवक घडवणारे व आपले सुख त्यागुन दुस-याचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाबा कै. ज्ञानदेव भोसले यांना भ भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कार्याला आमंचा सलाम..