चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.26 एप्रिल) :-
साथ जियेंगे साथ मरेंगे च्या आणाभाका घेतलेल्या एका प्रियकराने प्रेयसीवर पेट्रोल टाकून जाळले व स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी मूल येथील वार्ड नं. ११ मध्ये घडली.
प्रियकराच्या सदर कृत्याने शहरात काहीवेळ खळबळ माजली होती. गळफास लावून जीवन संपविणा-या प्रियकराचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे वय (45) रा. मूल वार्ड क्रं.11 असे आहे. घरा शेजारी राहणा-या एका विवाहीत महीलेशी मृतक बंडुचे प्रेमाचे सुत जुळले. दिवसागणीक दोघांचेही प्रेम बहरू लागले.
अनेक वर्षापासुन सुरू असलेले बंडु आणि गुड्डीचे प्रेम कालांतराने एकमेकांना करमेनासे झाल्यानंतर कुटूंबियांसह मिञमंडळीत चर्चेचे झाले. काही घटनांमूळे प्रेयसी गुड्डी आपल्या मुलासह राहत होती. तर मृतक बंडु पत्नी आणि मुलासह राहत होता. गुड्डी नामक महीलेशी आपल्या पतीचे प्रेमसंबंध असल्याची माहीती मृतक बंडुच्या पत्नीला माहीत होते. त्यामुळे मृतक बंडु आणि त्याच्या पत्नी मध्ये वारंवार वाद होत होते. परंतु प्रेमाच्या आणाभाका घेतलेला बंडु गुड्डीसाठी दिवाना झाला होता.
पतीच्या पश्चात तीच्या कुटूंबाची काहीअंशी जबाबदारीही मृतक बंडु सांभाळत होता. स्वतःच्या कुटूंबासोबत प्रेयसीच्या कुटूंबाची जबाबदारी सांभाळतांना बंडुची अनेकदा दमछाक व्हायची. दरम्यान काही दिवसांपासुन मृतक बंडु आणि प्रेयसी गुड्डी मध्ये वाद होऊ लागले. घटनेच्या चार दिवसांपासुन मृतक बंडु कौटुंबिक कार्यक्रमानिमित्य कुटूंबासह बाहेरगांवी होता.
घटनेच्या दिवशी दुपारी मृतक बंडु पत्नीसह मूलला पोहोचला होता. पत्नीला राहत्या नवीन घरी सोडून कामाचे कारण सांगुन बंडु घराबाहेर पडला. काहीसा तणावात असलेला बंडु वार्ड क्रं. ११ येथील जुन्या घरासमोर राहत असलेल्या गुड्डीच्या घरी पेट्रोलची बाँटल घेवुन पोहोचला. त्या ठिकाणी बंडु आणि गुड्डी मध्ये वाद झाल्यानंतर तणावात असलेल्या बंडूने बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल प्रेयसी गुड्डीच्या अंगावर टाकुन तीला पेटवुन दिले व स्वतःच्या राहत्या जुन्या घरी कोणी नसल्याची संधी साधुन बंडुने गळफास घेवून जीवन संपविले.
दरम्यान गुड्डी पेटत असल्याचे चिञ दिसताच शेजा-यांनी प्रयत्न करून गुड्डीवरील आग विझवुन लागलीच तीला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या गुड्डी जिल्हा सामान्य रूग्णालायात उपचार घेत आहे. चौकशी अंती सदरचा प्रकार हा बंडुने केला असुन बंडु जुन्या घरी असल्याचे समजले. लागलीच पोलीसांनी गुड्डीच्या घरालगतच्या बंडुच्या जुन्या घरी गेले असता बंडुने गळफास लावुन जीवन संपविल्याचे दिसुन आले. सदर घटनेची पोलीस स्टेशन मूल येथे नोंद करण्यात आली, समाजमन सुन्न करणाऱ्या सदर घटनेमूळे काही काळ पोलीस स्टेशन परीसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामूळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन घ जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेसी यांनी पोलीस स्टेशन आणि घटनास्थळी भेट देवुन परिस्थीती शांत केली. आग लावुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कारणावरून मृतक बंडू निमगडे यांचे विरूध्द कलम ३०७ चा गुन्हा दाखल केला असून आत्महत्या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार बन्सोड हे करीत आहेत.
