राजकीय कार्यकर्तेच बनले रेती चोर,पारोधी नदीतून सर्रास रेतीची चोरी. महसूल विभाग झोपेत

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.2 नोव्हेंबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या पारोधी नदीमधून सर्रास पने रात्रौ बेरात्री रेतीची तस्करी होत असून शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे शिवाय संबंधित असलेले विभाग महसूल विभाग झोपेचे सोंग् घेऊन डोळे असून आंधळे बनत असल्याचा प्रकार समोर येत आहे . तेव्हा चोरी करणाऱ्या या चोरट्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पारोधि वासियानी केली आहे . 

      सविस्तर वृत्त असे आहे की.शेगाव येथून पाच किलोमिटर अंतरावर असलेले पारोधी गाव व तालुका भद्रावती मध्ये येत असलेल्या गावलगत असलेल्या नदीतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असून या वर्षी देखील नदीतून पाणी कमी होताच रेती चोरट्यांची यावर मोठी करडी नजर असून रेती चोरी करण्यास सुरुवात केली आहे. यावर महसूल विभाग स्थानिक संबधित विभाग ग्रामपंचायत यांची कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच स्थानिक तलाठी यांना सांगितले असता उधट बोलून तहसीलदार यांना सांगा असे सांगतात.

तसेच तहसीलदार साहेब यांना सांगितले असता हो मी येतो कारवाई करतो. असे सांगतात परंतु येण्यास ते दिरंगाई करतात. व येण्यापूर्वीच रेती तस्करांना याची माहिती मिळतात तेव्हा रेती तस्कर येथून पळ काढून पो बारा होतात. व शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून लाखो रुपयांचा चुना लागत रेती चोरटे गोर गरीब जनतेला बेभाव रेती विक्री करून बल्लढ्या होताना दिसत असल्याचे नागरिक सांगतात.. 

         विशेष म्हणजे या रेती घाटावरून या नदीतून शेगाव बू , चंदनखेडा , बोरगाव धांडे , येथील राजकीय कार्यकर्तेच रेतीचा एव्यध व्यवसाय करतात.तर काही ग्राम पंचायत चे पदाधिकारी देखील असल्याचे नागरिकांनी सांगितले.

तेव्हा या रेती व्यवसायावर आळा घालण्यासाठी मान. श्री . जिल्हाधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे शिवाय स्थानिक तलाठी तसेच तहसीलदार साहेब यांच्यावर जनतेचा विश्वास नाही कारण यांची सुधा रेती तस्कराशी हात मिलाप असू शकते. तेव्हा शासनाच्या डोळ्यात धूळ झोकनाऱ्या रेती चोरट्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे शिवाय रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर ट्रॉली , वाहने देखील जप्त करण्यात यावे तसेच एव्यंध्य रेती तस्करी व रेती चोरीचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा.