संतश्रेष्ठ श्रीच्या पादुका दर्शन सोहळ्यातील भव्य भजन दिंडीने भद्रावती नगरी दुमदुमलीThe city of Bhadravati was resounded with the grand bhajan Dindi of the Paduka Darshan ceremony of Saint Shrestha Shri

🔹स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचा उपक्रम

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि. 22 एप्रिल) :-

            स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या विद्यमाने अक्षय तृतीया सणाच्या शुभ पर्वावर आज  दि. २२ एप्रिल रोज शनिवारला स्थानिक श्री मंगल कार्यालय मेन रोड येथे संतश्रेष्ठ श्रीच्या पादुकांचा दर्शन सोहळा व महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    याप्रसंगी संतश्रेष्ठ श्रीच्या पादुका दर्शन सोहळ्यातील भव्य भजन दिंडीने भद्रावती नगरी दुमदुमली . या सोहळ्यात अठरा भजन दिंड्यांसह हजारो भाविकांनी सहभाग घेऊन संतश्रेष्ठ श्रीच्या पादुका दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी भाविक बंधू -भगिनींनी अखंड महाराष्ट्राचे दैवत संतश्रेष्ठ श्रीरामदास स्वामी महाराज, संतश्रेष्ठ स्वामी समर्थ महाराज, संतश्रेष्ठ गजानन महाराज, संतश्रेष्ठ साईनाथ महाराज  आणि संतश्रेष्ठ श्री जगन्नाथ महाराज यांच्या प्रत्यक्ष पादुकांचे दर्शन घेतले.     

   आज  शनिवार रोजी दुपारी  रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांच्या निवासस्थानी श्रीच्या पादुकांचे भव्य आगमन झाले. या नंतर शहरातील प्रमुख मार्गाने भव्य भजन दिंडी काढण्यात आली. या दिंडीत शहरी व ग्रामीण अश्या एकूण अठरा महिला व पुरुष भजन दिंडया सहभागी झाल्या. या सोहळ्यात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे.

ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, भास्कर ताजने, ज्ञानेश्वर डूकरे, नरेंद्र पढाल, वासुदेव ठाकरे, प्रशांत कारेकर, बाळा पा.पडवेकर, घनश्याम आस्वले, प्रदिप महाकुलकर, सुनिल मोरे, रोहन कुटेमाटे, विश्वास कोंगरे, श्रीहरी भोयर, शंकर रासेकर, पवन हुरकट, दत्ता बोरेकर, विलास घोटकर, अनुप कुटेमाटे, विनोद पांढरे, धनराज भोयर, महेंद्र भोयर, विशाल आवारी, संतोष माडेकर, विलास जिवतोडे.

अरूण घुगुल,वशिष्ट लभाने, सुषमा शिंदे, निलिमा शिंदे,नर्मदा बोरेकर, आश्लेषा भोयर,रुपाली शिंदे, ज्योती आसुटकर, ज्योती बांधुरकर, संगिता खिरटकर, वर्षा गाढवे, निरंजना हनवते, श्रीदेवी हनवते , सपना शिंगरु ,सुलभा पतींवर ,वृषाली पांढरे, सुनिता खंडाळकर, गौरी वैद्य ,रंजना गुंडावार, स्वाती झुणखंडीवार, सुरेखा पवार ,वंदना इंगळे ,शितल पवार , प्रज्वल नामोजवार ,मनोज पापडे ,उमेश वालदे ,अनिल पडोळे , ,संजय दोघंटीवार, गौरव नागपुरे, गोपाल सातपुते, शंकर भोंगळे, गजानन उताणे, अमोल मेश्राम, शुभम शिंदे, केतन शिंदे, अक्षय बंडावार. तेजस कुंभारे यांच्यासह असंख्य बंधू -भागिनी सहभागी झाले.