वरोरा येन्सा येथे स्व: खा.बाळु धानोरकर जयंती निमित्य रक्तदान शिबिर  Self : Mr. Balu Dhanorkar Jayanti Blood Donation Camp at warora Yensa

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.3 जुलै) :- रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते.

प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. रक्तदानासारखे पुण्य कार्य जगात कोणतेही नाही. ही भावना लक्ष्यात ठेवून वरोरा तालुक्यातील येन्सा येथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त 3 जुलै रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

                   यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजू चिकटे, माजी सभापती पंचायत समिती रवींद्र धोपटे, माजी नगरसेवक राजू महाजन, माजी उपाध्यक्ष अनिल झोटिंग, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मुजनकर, बाजार समिती वरोरा संचालक पुरुषोत्तम पावडे, संचालक दिनेश कष्टी, बाजार समिती संचालक हरीश जाधव, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष शुभम चिमुरकर, एनएसयूआय तालुका अध्यक्ष रुपेश तेलंग, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल आसुटकर, ग्राम पंचायत येन्सा सरपंच रवी भोयर, डॉ. लक्ष्मीकांत डाखरे, डॉ. प्राची रोडे, विनोद बाफना, मनोज दानव, संजय घागी, निलेश भालेराव, सलीम पटेल, सानी गुप्ता, ग्यानीवंत गेडाम,अरुण बरडे, संगीता आगलावे, सारिका धाबेकर, जया चिंचोलकर, राहुल नन्नावरे, रोजवान शेख, फकीरचंद कोटांगले, मयूर वीरूटकर, महादेव आंबेकर, गोलू पाटील, रुपेश लांडे, विनोद जेणेकर, मनोज चीडे, अरविंद झाडे, सुजित कष्टी, अजय पिंपळशेंडे, सुरज बावणे, त्रिशुल निर्बुद्ध, संजय आंबेकर, संजय मोडक यांची उपस्थिती होती.             

                   भविष्यात गरजुंना रक्ताची गरज भासू नये, यासाठी परिसरातील जनतेने रक्तदान शिबिर केंद्रावर येऊन स्वइच्छेने रक्तदान करून दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त खरी आदरांजली वाहण्यात यावी, असे आवाहन रक्तदान शिबिराचे आयोजक वरोरा तालुका काँग्रेस कमिटी, वरोरा तालुका विद्यार्थी काँग्रेस ( एन एस यु आय), वरोरा तालुका युवक काँग्रेस यांनी केले आहे.