आई समोर चार वर्षाच्या बालकाला उचलून नेले वाघाने  A tiger picked up a four-year-old boy in front of his mother

🔸दुसऱ्या दिवशी बालकांचे अवयव विच्छिन्न अवस्थेत मिळाले 

🔸The next day, the child’s organs were found mutilated

चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.30 मार्च) :- अंगणात शौचास बसलेल्या चार वर्षाच्या बालकावर वाघाने हल्ला चढविला व आईच्या समोरच तोंडात पकडून पळ काढला ही घटना बुधवार रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून हर्षद संजय कारमेंगे(४) रा. बोरमाळा असे बालकाचे नाव आहे . 

दबा धरून बसलेल्या वाघाने आईच्या डोळ्यासमोरुन काळजाचा तुकडा पळवुन नेल्याने मातेने हंबरडा फोडला. क्षणातच गावातील नागरीक घटना स्थळा कडे धावुन आले.तो पर्यंत चिमुकल्या हर्षदला घेवुन वाघ पसार झाला होता,या घटनेची माहीती चंद्रपुर वनविभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे व चंद्रपुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घोरुडे यांना मिळताच घटना स्थळी रात्रीच दाखल झाले.

सावलीचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रविण विरुटकर व पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग पोलीस व गावक-यांनी रात्रभर संयुक्त रित्या सर्वत्र शोध मोहीम राबवली आजुबाजुला अनावश्यक झुडपे असल्याने रात्रीच्या अंधारात अडथळा निर्माण झाला होता.

रात्रभर युध्द स्थरावर अथक प्रयत्न सुरु असतांनाच दुसरा दिवस उजाडताच सकाळी सहा वाजता दरम्यान घटना स्थळा पासुन चारशे मीटर वर चिमुकल्या हर्षद चा अर्धवट फस्त केलेला शरीराचा काही भाग सापडला. मनाला विचलीत करण्या-या अवस्थेतील शरीराचा अर्धवट कमरे खालील भाग,एक हात व अर्धवट खाल्लेला डोक्याचा भाग आढळुन आला.

घटना स्थळाचा पंचनामा शव उत्तरीय तपासणीसाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.मात्र या परिसरातील मानवी वस्त्या लगत नित्याने वाघ व बिबटांचा होणारा संचार लक्षात घेता ,हल्लेखोर वन्य जिव हा वाघ की बिबट ह्या बद्दल वन विभाग अनभिज्ञ असुन घटना स्थळ परिसरात पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शासन नियमानुसार मृतकाचे कुटुंबास तातडीची मदत म्हणून पंचेविस हजार रोख,व चार लाख पंचाहत्तर हजारांचा धनादेश स्थानीक सरपंच भोजराज धारणे व उपसरपंच यांच्या उपस्थितीत विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांनी सुपुर्द केला.

 या घटनेमुळे गावात तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.