✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.13 ऑक्टोबर) :- सन 2023 मध्ये कार्यकाळ झालेल्या दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण तसेच बोरगाव देशपांडे प्रभाग क्रमांक दोन मध्ये पोट निवडणूक तहसीलदार वरोरा कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले असून पाच नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम ही 7 सदस्य असलेले ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत सालोरी येथे 9 सदस्य ग्रामपंचायत असून दोन्ही ग्रामपंचायत ठिकाणी आरक्षण सोडत सरपंच पदासाठी जनतेमधून निवडून देणे आहे तसेच बोरगाव देशपांडे येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांनी 16 ते 20 तारखेपर्यंत फार्म भरवाची मुदत तर फार्म उचलण्याची, चिन्ह देण्याची तारीख 25 ऑक्टोंबर दिली असून, ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम येथे प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण स्त्री,, प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री, याप्रमाणे असणार असून सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती स्त्री चे आरक्षण सोडण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत सालोरी येथे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती ,अनुसूचित जाती याप्रमाणे असून सरपंच पदाकरिता सर्वसाधारण स्त्रीचे आरक्षण सोडण्यात आलेले आहे.
