चंदनखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadarwati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.20 फेब्रुवारी) :- तालुक्यातील संसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेल्या मौजा चंदन खेडा येथे मोठ्या थाटात शिवजयंती साजरी करण्यात. आला. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या चंदनखेडा गावत कोणतेही शासकीय सन उत्सव मोठ्या थाटात साजरा केल्या जाते.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा मौजा चंदनखेडा जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा तसेच छत्रपती मंडळाचे वतीने गावात मिरवणूक काढण्यात आली व ग्रामपंचायत कार्यालयात मूर्तीचे पूजन करून तसेच गावातील बिरसा मुंडा चौकात भगवा झेंडा सरपंच श्री. नयन जांभुळे यांचे हस्ते फडकवून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच शिवजयंती चे औचीत्य साधून सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत मंजूर झालेल्या बसस्टॉप परिसर सौदर्यकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीरभाऊ मुडेवार होते तर उद्घाटक म्हणून सरपंच श्री. नयन बाबाराव जांभुळे हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत उपसरपंच सौ भारती उरकांडे माजी सरपंच सूमित भाऊ मुळेवार, ग्रामपंचायत सदस्य श्री बंडूजी निखाते, श्री. निकेश भागवत, श्री. नाना बगडे सौ. मुक्ता सोनुले सौ. प्रतिभा दोहतरे, सौ. रंजना हनवते, सौ. सविता गायकवाड, सौ. श्वेता भोयर, सौ. आशा नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. ईश्वर धांडे , महात्मा गांधी तंटमुक्त अध्यक्ष श्री. मनोहर हनवते पोलीस पाटील समीर खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.