डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारा करीता प्रकाश मेश्राम यांची निवड Selection of prakash meshram for Dr. Babasaheb Ambedkar national award

148

✒️ योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा प्रतिनिधी)

मालेवाडा (दि.24 मार्च) :- चिमूर तालुक्यातील खापरी धर्मु या खेड्यातील रहिवासी प्रकाश मेश्राम याना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने दिला जाणारा 2023 चा डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारा करीता प्रकाश मेश्राम यांची निवड करण्यात आली आहेे.

मेश्राम यांनी सामाजिक क्षेय्रात (वादळ निळ्या क्रांतीचे)उत्कृस्ट प्रबोधनकार गायक,कवी,प्रखर वक्तृत्व क्षेत्रात कमी वयात झेप घेतली आहे तर राजकीय क्षेत्रात गावातील उपसरपंच ते सरपंच सलग दोनदा पदाला न्याय दिला आहे,मूकनायक फाऊंडेशन चे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळून ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे, जनावरांना लंपी रोग जाणीव जागृति आदी शिबिराचे आयोजन करून मनाचा तुरा रोवला आहे तर 2012 ला शब्द निळ्या पाखरांचे हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे,तर उत्कृष्ट सुत्रसंचलन करिता तालुका, जिल्हास्तरावर कार्यक्रम पार पाडीत असतात.

या सर्व कार्याची दखल घेऊन प्रकाश मेश्राम यांना जागतिक आंबेडकर वादी साहित्य महामंडळाच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्य दि 26 मार्च 2023 ला विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन हाल झाशी राणी चौक नागपूर येथे ठीक सकाळी 11 वाजता साहित्यिक ड्रा श्रीपाल सबनीस पुणे,व जेस्ट मन्यवरच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,पुस्तके देऊन गौरविण्यात येणार आहे तरी त्यांचे प्रा नरेंद्र मेश्राम,मनोज सरदार,तालाशकुमार खोब्रागडे,जितेंद्र भोयर संदीप पाटील ,राहुल रामटेके यांनी अभिनंदन केले

https://smitdigitalmedia.com/