✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)
भद्रावती (दि.24 मार्च) :- आयुध निर्माणी येथे बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम आहे ते अज्ञात चोट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फूटले नसल्याने कोणतीही चोरी झाली नाही . ही घटना रात्री बाराच्या दरम्यानची असून अज्ञात चोरटे एटीएम फोडत असल्याची सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे .
या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू असुन दुहेरी हत्येतील आरोपी एकच तर नाही ना या दिशेने पोलीसांचा तपास सुरू आहे
