विना परवाना फटाक्याची सर्रास विक्री

57

🔸शेगाव पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 नोव्हेंबर) :- स्थानिक शेगाव बू येथे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्य मार्गावर अनेक फटाक्यांचे दुकाने सजली असून यात चिमुकले बालक तथा नवयुवक फटाके घेण्यात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे परंतु काही दुकानाची चौकशी केली असता त्यांना विचारपूस केली असता आमच्याकडे फटाका विक्री करण्याचे लायसन परवाना असल्याचे सांगण्यात येथे परंतु येथील मुख्य मार्गावर तसेच भर गावात असलेले अनेक दुकान दारापाशी परवाना नसल्याची गुप्त माहिती प्राप्त होत आहे .

तेव्हा परवाना नसलेल्या दुकानदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे . शिवाय फटका दुकाने मुख्य मार्गावर तसेच गावात असल्याने काही विपरीत परिणाम झाल्यास यास जबाबदार कोण ? असा सवाल निर्माण होत आहे शिवाय याच दुकानातून शेगाव येथील पोलीस कर्मचारी फटाके विक्री करीत असल्याचे पाहायला मिळाले .

तेव्हा गावात अनौपचारिक दुर्घटना न व्हावी या करिता फटाक्याच्या दुकानाची सखोल चौकशी करून विना परवाना धारक दुकानदारावर कठोर कारवाई करण्यात यावी व फटाक्यांचे दुकान गाव बाहेर बाजार वाडीत हलविण्यात यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत . यावर शेगाव येथील ठाणेदार याकडे काय लक्ष देतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत…