🔸राष्ट्रीय पुरस्कृत विजेते परमानंद तिरानिक यांची मागणी
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.16 मार्च) :- राज्यातील सरकारी व निमसरकारी 18 लाख कर्मचारी जुनी पेन्शन सुरू करावी म्हणून गेले दोन दिवस पासून बेमुदत संपावर गेले आहे. नवीन पेन्शन पद्धतीनी मिळणारी रक्कम तत्पुंजी असते त्या रकमेवर एकत्याचाही गुजराण होणे अशक्य आहे . म्हणून मागणी करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरले आहे.
अश्या वेळी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकार कार्यवाहीचा धमक्या देत मात्र राज्यकर्ते जमात स्वतःची पेन्शन शाबूत ठेवून निव्वळ सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुन्हा लागू केल्यास सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडून राज्याची आर्थिक घडी विस्कटन्याची भीती व्यक्त करून आंदोलन दडपण्याचा षडयंत्र रचले जात आहे.
भारतीय संविधानाच्या राज्य घटनेची तोडफोड करून खाजगी एजसीला जग विकण्यासाठी खतपाणी घालण्याचे काम करीत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नयेत . म्हणून संपावर गेलेल्या 18 लाख कर्मचारीनी सरकारला न घाबरता जशास तसे उत्तर देऊन संप कायम ठेवावा जुनी पेन्शन योजना बंद झाल्यावर आता पर्यंत विविध पक्ष सत्तेवर आले .
पण तेव्हा मोठ्या प्रमाणावर मागणी संप झाले नाहीत म्हणून …. आमचा आवाज दाबण्याचा सरकारने प्रयत्न करू नयेत . जशी तुम्ही आम्हा सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केली तशीच मग आमदार , खासदार , मंत्री , व अन्य लोकप्रतिनिधीची सुधा पेन्शन बंद करावी . अशी तीव्र स्वरूपात प्रतिक्रिया आदिवासी कला सवरधन समितीचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरस्कृत अनेक पुरस्कार प्राप्त कला शिक्षक श्री परमानंद तीरानिक यांनी संपला पाठिंबा देत माहिती विषद केली .
ते पुढे म्हणाले की लोकप्रतिनिधींना प्रत्येक पक्षाची वेगवेगळी पेन्शन मिळते . पूर्ण मुदत पुरी केली नसली तरी लोकप्रतनिधींना हयातभर पेन्शन योजना मिळते . मग सगळी हयात सरकारी सेवेत घालविणाऱ्याना पुरेशी पेन्शन का नको .? जुनी पेन्शन योजना लागू करीत नसाल तर तुम्हा लोकप्रतनिधींची सुद्धा पेन्शन बंद व्हायलाच पाहिजे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे…
