चारगाव धरणाची खोलीकरण करणे गरजेचे..अभिजीत पावडे Deepening of Chargaon dam is necessary..abhijeet pavde

454

✒️ आम्रपाली गाठले शेगांव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगांव बू (दि.16 मार्च) :- चंद्रपूर जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकावर असलेले चारगाव मध्यम प्रकल्प चारगाव धरणाची निर्मिती 1985 साली झाली असून आजच्या परिस्थितीत शेवटची घटका मोजत असल्याचे दिसत आहे .  

        या धरणाची निर्मिती होऊन 40 वर्ष लोटून गेलीत तेव्हा पासून या धरणाकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष आहे . शिवाय या धरणाची पाणी पातळी कमी झाली असून भर पावसाळ्यात तसेच भर उन्हाळ्यामध्ये पाणी साठा कमी होत असल्याने शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो . करिता या धरणाची पूर्णतः पाहणी करून पडलेले भगदाड तसेच डागडुजी तात्काळ करण्यात यावी ..

      विशेष म्हणजे तलाव लगत असलेले अनेक शेतकरी जसजसे तलावाचे पाणी कमी होत गेले तसतशी जमीन काबीज करून ट्रॅक्टर च्या साह्याने नागरणी वखरणी करून शेती करतात व भुसभुशित झालेली जमीन माती पावसाळ्यामध्ये तलावात मिसळते त्यामुळे हे तलाव पूर्णतः बुजलेले आहे . त्यामुळे अल्पष्या पावसामुळे देखील हे तलाव भरून ओव्हरफ्लो होते . व परिसरात पुर परिस्थिती निर्माण होते अनेक गावातील शेती मध्ये पुराचे पाणी जाऊन शेत पिकाची नुकसान करते यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फार मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असतो .

करिता या धरणाचा पाणी साठा वाढविण्या करिता या चारगाव मध्यम प्रकल्प धरणाचे खोलीकरण करणे गरजेचे असून जेणे करून शेतकऱ्यांचे देखील नुकसान होणार नाही व परिसरातील चारगाव खुर्द , चारगाव बूज , अर्जुनी , धानोली , दादापूर , मानोरा, इत्यादी गावातील शेती ओलिताखाली राहून अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तसेच पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान होणार नाही.पाण्याचा योग्य वापर झाला तसेच पाणी पुरवठा जास्त प्रमाणात तलावात साठून राहिला तर याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना होईल .

करीता या गंभीर प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करण्या करिता तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन युवा शेतकरी श्री अभिजीत पावडे हे प्रत्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले..