विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामा करुनही शेतकरी भरपाई पासून वंचित…शेतकरी नेते विनोद उमरे

🔹एका रुपयात काढला पीकविमा मात्र अजूनही शेतकरी लाभापासून वंचित

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.28 नोव्हेंबर) :- जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार एक रुपयांमध्ये पीक विमा काढला.परंतु यंदा अतिवृष्टीमुळे कित्येक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठे नुकसान झाले.अनेकांची शेती पिके खरडून गेली.त्यामुळे यासंदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली.

यानंतर पीकविमा प्रतिनिधी कडून नुकसनाची पाहणी देखिल केली होती.परंतु तरीही अनेक शेतकऱ्यांना विम्याचा त्याचा लाभ मिळालेला नाही.त्यामुळे प्रशासने याची दखल घेण्याची मागणी शेतकरी नेते विनोद उमरे व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

यदा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे शेतातील पाण्यामुळे पीक नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.अशा परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना विम्याचा आधार होता.परतु विमा कंपनीने पंचनामे करुनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही यांची चौकशी करणे गरजेचे आहे.आणि त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.