Home चंद्रपूर ९ मार्चपासून तांडा सुधार समितीचे अर्धमुंडण आंदोलन

९ मार्चपासून तांडा सुधार समितीचे अर्धमुंडण आंदोलन

0

✒️गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी) 

महागाव (दि.23 फेब्रुवारी) :- पुसद तालुक्यातील पीक विमा,प्रोत्साहनपर अनुदान, नुकसान भरपाई तातडीने मिळावी, माळपठारावरील पांदन रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे, मागेल त्याला विहीर धोरण राबविण्यात यावे, सोयाबीन कापूस दरवाढ करण्यात यावी.

शेतीसाठी सिंचन व्यवस्था करण्यात यावी अशा मुख्य मागण्यांसह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन अखिल भारतीय तांडा सुधार समिती ९ मार्च २०२३ पासून अर्धमुंडण आंदोलन करणार असल्याचे निवेदन तांडा सुधार समितीचे विदर्भ प्रमुख जिनकर राठोड व यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांनी मा. उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिले.

       मागील दोन तीन आंदोलनात प्रशासनाकडून केवळ आश्वासन दिल्या गेले. लेखी आश्वासन देऊनही प्रशासन आश्वासन पाळत नाही. त्यामुळें शेतकरी संतापले असून याची प्रचिती ९ मार्चच्या आंदोलनात प्रशासनाला कळून चुकेल असा गर्भित इशारा संजय आडे यांनी दिला आहे

https://smitdigitalmedia.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here