अभिनेत्री कांचन भोर यांचा रेड हींदी चित्रपटामध्ये दमदार इन्ट्री पहायला मिळेल लवकरच

✒️सुनील भोसले मुंबई (Mumbai प्रतिनिधी)

मुंबई(दि.8 नोव्हेंबर) :- अभिनेत्री कांचन भोर ह्यांना लहानपणापासून कला क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा होती आणि आपली इच्छा चित्रपटातून पूर्ण करू असं मनाशी बाळगून पुढील प्रवास सुरू केला .लवकरच तिचा आत्ता एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कांचन भोर हि तिचा आगामी हिंदी चित्रपट फायर ऑफ लव्ह रेड ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे .

कांचन भोर हीचे तिच्या आगामी चित्रपटा मुळे बॉलिवूड चित्रपट सृष्टीत एक ओळख निर्माण झाली आहे अशा या गुणी अभिनेत्रीने हिंदी माध्यमातून आपला मॉडेल आणि अभिनेत्री चा प्रवास पूर्ण केलेला आहे . कुठलाही चित्रपट क्षेत्राचे पाठबळ नसताना किंवा कोणी गॉडफादर नसताना काम करण्याची संधी जिद्द चिकाटी मेहनत आणि स्वबळावर आणि आपल्या उत्कृष्ट अभिनय च्या जोरावर अभिनेत्री कांचन भोर ने समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटायला सुरुवात केली आहे . अशा या अभिनेत्रीला सर्व फॅमिली कडून आणि सर्व जनते कडून तिला भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत .

तिला चित्रपटात प्रत्येक प्रकारच्या भूमिका करायला आवडेल असे ती म्हणते . तिच्या पुढील कार्यासाठी तिला हार्दिक शुभेच्छा असच ती काम करत राहो आणि स्वतःचं आणि फॅमिलीच सगळ्यात मोठं नाव तिने कमवावं आणि लवकरच तिच्या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यावा . तिची धडपड बघण्यासाठी सगळेजण उत्सुकाने वाट बघत आहेत. धन्यवाद.