खरोखरच वरोरा वासियांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय मिळते काय

🔹वरोरा वासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या साठी मुख्यधिकारी यांना मनसे चे निवेदन अन्यथा आंदोलन

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.16 फेब्रुवारी) :-  शहरातील पाणी पुरवठा योजना ही सन १९७२ पासूनची असून शहरात सर्वत्र पसरलेल्या पाईप लाईन खराब झाल्या आहे व जागोजागी लिकेज होऊन त्या पाईपातून दूषित पाणी पुरवठा होतं आहे, शिवाय ज्या ठिकाणाहून पाणी शहराला पोहचते त्या तुराना नदीवर असलेल्या मशीन (मोटर) खराब झाल्याने वेळोवळी बिघडतात त्या मशीन मुळे शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा होतं नाही.

खरं तर बोअरवेलचे पिण्यायोग्य नसलेले पाणीच शहरातील नागरिकांना प्यावे लागतात पर्यायाने शहरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून जनता विविध आजाराला बळी जातं आहे त्यामुळे शहरातील जनतेला सुरळीत शुद्ध पाणी पुरवठा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपरिषद च्या भोंगळ कारभाराविरोधात जनआंदोलन करेल असा इशारा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

  मागील भाजप प्रणीत नगरपरिषद सत्ताधारी यांनी केंद्राकडे जवळपास ६६ कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना प्रशासकीय मान्यता घेऊन मंजुरी करिता पाठवली खरी पण त्या संदर्भात कुणाही लोकप्रतिनिधी, राजकारणी व स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने केंद्र व राज्य शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा केला नाही त्यामुळे ही योजना आता लवकर मंजूर होईल याबाबत साशंकता आहे.

दरम्यान वर्धा नदीवर जो बंधारा वर्धा पॉवर व जीएमआर कंपनीने बांधला त्यात वरोरा शहरातील जनतेला हक्काचे पाणी मिळावे म्हणून आरक्षण ठेवण्यात यायला हवे होते पण नगरपरिषद प्रशासन व येथील तत्कालीन सत्ताधारी यांनी जुन्याच पद्धतीने पाणी पुरवठा योजना सुरू ठेवण्याबाबत घेतलेला निर्णय शहरातील जनतेला वेठीस धरणारा आहे. 

तालुक्यातील वर्धा पॉवर व जिएमआर कंपन्यांनी आजपर्यंत वरोरा शहराच्या विकासासाठी सीएसआर फंडातून भरीव निधी दिलेला नाही, नगरपरिषद ला रॉयल्टी दिलेली नाही त्या कंपन्यांनी वरोरा शहरातील जनतेला किमान पिण्याचे शुद्ध पाणी तर द्यायला हवे पण नगरपरिषद सत्ताधारी यांच्या संधीसाधू धोरणामुळे शहरातील जनतेला त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे हे खरे तर लोकशाहीचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

कारण येथे माजी नगरसेवकच अनेक कंत्राटे दुसऱ्यांच्या नावाने घेतात व स्वतः कामे करतात त्यात पाणी पुरवठा करण्याचे कंत्राटदार सुद्धा नगरसेवक असल्याने जनता नगरपरिषद चा ठेका घेण्यासाठी नगरसेवकांना निवडून देतात कां ?असा प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून मुख्याधिकारी यांना करण्यात आला आहे. 

शहरातील बावणे ले आऊट सह अनेक भागात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन नाही अनेक भागात बोअरवेल व बोअरिंग याद्वारेच पाणी पुरवठा होतो पण ते सुद्धा नादुरस्त असतात पण ज्या कंत्राटदार यांना यांचे कंत्राटे दिली ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामध्ये स्थानिक नगरपरिषद प्रशासन टक्केवारी घेऊन गप्प आहे.

त्यामुळे आता शहरातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यास नगरपरिषद प्रशासन हदबल झाले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे येणाऱ्या १० मार्चपर्यंत पिण्याच्या पाणी संदर्भात योग्य ती उपाययोजना करून वरोरा शहरातील जनतेला पिण्याचे सुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना १५ मार्च २०२३ रोज बुधवार ला नगरपरिषद वर भव्य मोर्चाद्वारे जनआंदोलन करून निषेध करेल असा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, विशाल देठे, राजेंद्र धाबेकर, प्रतीक मुडे प्रकाश धोपटे, नामदेव जिवतोडे, विष्णू मुंजे, मनसे महिला सेना तालुका अध्यक्षा रेवती इंगोले, शहर अध्यक्षा पौर्णिमा शेट्टे, शहर संघटिका ज्योती मुंजे, उपाध्यक्षा अनिता नकवे शुभांगी मोहरे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.